Saturday, October 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedआकाशात भरारी घेणाऱ्या महिला वैमानिकांचा सन्मान* *नवरात्रीत श्री...

आकाशात भरारी घेणाऱ्या महिला वैमानिकांचा सन्मान* *नवरात्रीत श्री महालक्ष्मी ट्रस्टच्या वतीने स्त्रीशक्तीचा जागर*

 

 

पुणे : आकाशात विमान चालविणाऱ्या महिला वैमानिकांपासून ते घरात राहून पुढील पिढी घडवणाऱ्या महिलांपर्यंत प्रत्येक स्त्री सशक्त आणि सामर्थ्यवान आहे. स्त्रीचे कर्तृत्व केवळ तिच्या व्यवसायावरून ठरत नाही, तर इतरांना घडवण्यात आणि त्यांना भरारी घेण्यासाठी बळ देण्यातही तिचे मोठे योगदान असते. मी वैमानिक असण्यापेक्षाही मोठे काम माझ्या आईने केले आहे. तिने आमचे पालनपोषण केले, आम्हाला घडवले आणि उडण्यासाठी पंख दिले. खऱ्या अर्थाने फेमिनिझम म्हणजे कधीतरी एक पाऊल मागे येणे, असे मत कॅप्टन गौरी बलकवडे यांनी व्यक्त केले.

 

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने श्री महालक्ष्मी ट्रस्ट, सारसबाग यांच्या वतीने नऊ दिवस नऊ क्षेत्रांतील महिलांचा सन्मान करून स्त्रीशक्तीचा जागर करण्यात येतो. याच उपक्रमांतर्गत महिला वैमानिक कॅप्टन गौरी बलकवडे, कॅप्टन भाद्रवी गडकरी आणि कॅप्टन अपूर्वा गिलजे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी स्मित मच्छार यांच्या शौर्यालाही अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला पोलीस अधिकारी मिलिंद मोहिते, मंदिराचे विश्वस्त भरत अग्रवाल, उत्सवप्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल, ॲड. प्रताप परदेशी आणि प्रवीण चोरबेले उपस्थित होते. मंदिराचे संस्थापक व प्रमुख विश्वस्त राजकुमार अग्रवाल आणि प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.

 

प्रत्येक स्त्री मग ती वैमानिक असो, नोकरी करणारी असो किंवा नोकरी न करणारी असो, तिच्यात सामर्थ्य आहे. स्त्रीशक्तीचे महत्त्व जाणून घेणे हीच मोठी गोष्ट आहे. फेमिनिझमच्या नावाखाली आपण वेगळ्याच मार्गाने जात आहोत. महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करताना त्याग, संस्कार आणि कुटुंबासाठी दिलेल्या योगदानाचे महत्त्वही लक्षात घेतले पाहिजे, अशा भावना महिला वैमानिकांनी व्यक्त केल्या.

 

मिलिंद मोहिते म्हणाले, नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे महिलांच्या कर्तृत्वाची पूजा करण्याचा काळ आहे. विविध क्षेत्रांतील महिलांचा सन्मान करण्याचा ट्रस्टचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे, असेही त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments