Saturday, October 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedशिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी स्ट्राँगरूमच्या सुरक्षिततेचा आढावा*

शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी स्ट्राँगरूमच्या सुरक्षिततेचा आढावा*

 

 

**त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक नियोजनाबाबत पोलिसांना सूचना**

 

पुणे, दि. १७ : पुणे विभागातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने बालेवाडी येथील श्री. शिवछत्रपती क्रीडासंकुलात उभारण्यात येणाऱ्या स्ट्राँगरूमच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून पाहणी करण्यात आली. स्ट्राँगरूमच्या सुरक्षिततेसाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था आणि आवश्यक बंदोबस्ताचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

 

या पाहणीवेळी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) बसवराज तेली, परिमंडळ-२ मधील पोलीस अधिकारी तसेच संबंधित पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. यावेळी स्ट्राँगरूमच्या परिसराची पाहणी करून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.

 

स्ट्राँगरूमच्या ठिकाणी डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर, हँड हेल्ड मेटल डिटेक्टर आणि सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच याच ठिकाणी मतमोजणी होणार असल्याने स्ट्राँगरूम आणि परिसरातील वाहतूक व्यवस्थेचाही आढावा घेण्यात आला. वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी पोलीस उप आयुक्त (वाहतूक) यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

 

शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, निर्भय, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान, तर २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments