Sunday, October 18, 2026
Google search engine
HomeUncategorized'वोट बचाओ, देश बचाओ'*  *काँग्रेसची देशव्यापी मोहीम*  ...

‘वोट बचाओ, देश बचाओ’*  *काँग्रेसची देशव्यापी मोहीम*  *माजी आमदार मोहन जोशी यांची*  *गुजरातच्या सहा जिल्ह्यांसाठी*  *निरीक्षकपदी नियुक्ती* 

 

 

पुणे : अखिल भारतीय कॉंग्रेस महासमितीने ‘वोट बचाओ, देश बचाओ’ प्रचार मोहीम हाती घेतली असून, त्यासाठी गुजरात राज्याच्या सहा जिल्ह्यांच्या निरीक्षकपदी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी संपूर्ण देशभरात १५० निरीक्षक नेमले असून त्यात मोहन जोशी यांचा समावेश आहे. मोहन जोशी यांच्याकडे गुजरात मधील सहा जिल्ह्यांच्या निरीक्षकपदाची जबाबदारी सोपविली आहे, त्यामध्ये सुरत जिल्हा, सुरत शहर, नवसारी, वलसाड, तापी आणि डांग या जिल्ह्यांचा समावेश आहे.

 

अखिल भारतीय काँग्रेस महासमितीच्या मोहीमेतील प्रत्येक टप्प्यावरील कार्यक्रम यशस्वी करणे, काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणे, त्यांना एकत्रित करणे, मोहीमेचा व्यापक प्रचार आणि प्रसिद्धी करणे आदी जबाबदाऱ्या निरीक्षकाने पार पाडावयाच्या आहेत. यानुसार पक्षाने सोपविलेली जबाबदारी मी पार पाडेन, अशी प्रतिक्रिया मोहन जोशी यांनी या नियुक्तीनंतर दिली आहे.

 

मोहन जोशी यांनी पक्ष संघटनेत निरीक्षक, प्रभारी म्हणून ११ राज्यांमध्ये तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये काम केले आहे. तेलंगण राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मोहन जोशी यांच्यावर जबाबदारी सोपविली होती. त्यात त्यांना १०० टक्के यश मिळाले. मोहन जोशी यांचा संघटनात्मक अनुभव लक्षात घेऊन अखिल भारतीय काँग्रेस महासमितीने ‘वोट बचाओ, देश बचाओ’ या देशव्यापी मोहीमेत त्यांचा समावेश केला आह

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments