संभाजीनगर प्रकल्पातून उत्पादन
पुणे, १९ ऑक्टोबर २०२६: ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज भारतात ऑल-न्यू ऑडी क्यू३ लाँच केली. या कॉम्पॅक्ट लक्झरी एसयूव्हीमध्ये १५० किलोवॅट पॉवर, क्वाट्रो ऑल-व्हील ड्राइव्ह आणि डिजिटल, लाइटिंग, तसेच कम्फर्ट तंत्रज्ञानाचा उत्तम मेळ साधण्यात आला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या केबिनमध्ये डिजिटल स्टेज पॅनोरॅमिक डिस्प्ले, हेड-अप डिस्प्ले आणि सोनोस प्रीमियम साउंड सिस्टीम देण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील एसएव्हीडब्ल्यूआयपीएल प्लांटमध्ये स्थानिक पातळीवर असेंबल केलेली ही ऑल-न्यू ऑडी क्यू३ ५१,९,९,००० एक्स शोरुम या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे.
ऑल-न्यू ऑडी क्यू३ मध्ये मायक्रो-एलईडी तंत्रज्ञानासह डिजिटल मॅट्रिक्स एलईडी हेडलाइट्स, चार निवडण्यायोग्य डे-टाइम-रनिंग-लाइट सिग्नेचर्स आणि तीन प्रगत डायनॅमिक लाइट सिक्वेन्सिंग देण्यात आले आहेत, तर मागील बाजूस इल्यूमिनेटेड ऑडी रिंग्ज वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण करतात. नवीन डिजिटल इंटरफेस ड्रायव्हरच्या भोवती सर्व डिस्प्ले, कंट्रोल्स आणि इन्फोटेनमेंट फंक्शन्स एकत्र आणतो. यामुळे कार चालवण्याचा अनुभव अधिक सुलभ आणि कनेक्टेड बनतो. तसेच या मॉडेलमध्ये नवीन इंटिग्रेटेड स्विच मॉड्यूल सादर करण्यात आले आहे, ज्यामध्ये उजवीकडील लिव्हरने गिअर निवडता येतो, तर डावीकडील लिव्हर लाइटिंग, विंडशील्ड वायपर आणि क्लिनिंग फंक्शन्स नियंत्रित करतो. हेड-अप डिस्प्ले ड्रायव्हरच्या थेट दृष्टीक्षेपात प्रवासाची महत्त्वाची माहिती प्रोजेक्ट करतो, ज्यामुळे डिजिटल कॉकपिटला पूरक ठरत आवश्यक माहिती सहज उपलब्ध होते.
या लाँचबाबत मत व्यक्त करत ऑडी एजीच्या सेल्स ओव्हरसीजच्या सीनियर डायरेक्टर व्हिक्टोरिया कॉफमन-रीगर म्हणाल्या, “आजचा दिवस ऑडी इंडियासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि मला या क्षणाचा भाग होताना खूप आनंद होत आहे. ऑडी एजीसाठी उदयोन्मुख बाजारपेठ म्हणून भारताचे महत्त्व वाढत आहे. भारतातील लक्झरी बाजारपेठ सातत्याने विकसित होत आहे आणि आम्ही आमच्या ग्राहकांच्या आकांक्षा, तसेच आमच्या ब्रँडचे वैशिष्ट्यपूर्ण रूप प्रतिबिंबित करणारी उत्पादने, तंत्रज्ञान आणि अनुभव सातत्याने देत राहू. ग्राहकांच्या महत्त्वाकांक्षा व अपेक्षा वाढत आहेत आणि ऑडीमध्ये त्यांच्यासोबत पुढे जाण्यासाठी आम्ही स्वतःला सज्ज ठेवू इच्छितो.”
या प्रसंगी मत व्यक्त करत एसएव्हीडब्ल्यूआयपीएलचे एमडी आणि सीईओ पियुष अरोरा म्हणाले, “ऑल-न्यू ऑडी क्यू३ ची निर्मितीही येथे भारतात छत्रपती संभाजीनगर येथील आमच्या अत्याधुनिक प्लांटमध्ये केली जात आहे. आम्ही एसएव्हीडब्ल्यूआयपीएलमध्ये विकसित केलेल्या कौशल्यांचे हे उत्तम सादरीकरण आहे, भारत आमच्यासाठी केवळ प्रमुख वाढणारी बाजारपेठ म्हणून नाही, तर प्रमुख मॅन्युफॅक्चरिंग आणि इंजिनिअरिंग केंद्र म्हणूनही दुहेरी भूमिका बजावत आहे, हे यातून प्रेरित होते. ”
ऑडी इंडियाचे ब्रँड डायरेक्टर बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, “भारतात ऑडी ब्रँडसाठी ऑडी क्यू३ फार पूर्वीपासून महत्त्वाची प्रवेशद्वार राहिली आहे आणि या कारची आतापर्यंतचे सर्वाधिक आधुनिक एडिशन सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ऑल-न्यू ऑडी क्यू३ क्वाट्रोचा आत्मविश्वास, शक्तिशाली कार्यक्षमता आणि दैनंदिन उपयुक्ततेसोबत लक्षणीयरित्या सुलभ टेक्निकल अनुभव तसेच अनेक विचारपूर्वक दिलेल्या आरामदायी व सुरक्षित वैशिष्ट्यांचा संगम घडवून आणते. या कारचे स्थानिक पातळीवरील असेंब्ली भारतातील बाजारपेठेप्रती असलेल्या आमच्या कटिबद्धतेचे आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, या कारचे वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्व, प्रगत तंत्रज्ञान आणि हाताळणीतील सहजता आधुनिक कॉम्पॅक्ट लक्झरी एसयूव्हीच्या शोधात असलेल्या ग्राहकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल.”
—————————————————————-
प्रमुख वैशिष्ट्ये:
ड्राइव्ह आणि कार्यक्षमता:
डायनॅमिक ड्रायव्हिंग अनुभवासाठी १५० किलोवॅट पॉवर आणि ३२० एनएम टॉर्क देणारे २.०-लिटर टीएफएसआय पेट्रोल इंजिन.
फक्त ७.१ सेकंदात ० ते १०० किमी/तास वेग.
आत्मविश्वासपूर्ण ट्रॅक्शन आणि नियंत्रणासाठी क्वाट्रो ऑल-व्हील ड्राइव्ह.
तुमच्या गरजेनुसार ड्रायव्हिंग अनुभवासाठी प्रोग्रेसिव्ह स्टिअरिंग आणि पाच मोड्स (बॅलन्स्ड, डायनॅमिक, कम्फर्ट, एफिशिअन्सी आणि ऑफरोड+) सह ऑडी ड्राइव्ह सिलेक्ट.
स्थिर व आरामदायी प्रवासासाठी कम्फर्ट सस्पेंशन.
चढाव आणि उतारावर अधिक आत्मविश्वासासाठी हिल होल्ड असिस्ट आणि डाउनहिल असिस्ट.
एक्सटीरियर:
डिजिटल मॅट्रिक्स एलईडी हेडलाइट्समध्ये २५,६०० मायक्रो-एलईडी, चार निवडण्यायोग्य डे-टाइम-रनिंग-लाइट सिग्नेचर्स आणि तीन लाइट प्रोजेक्शन्ससह प्रगत डायनॅमिक लाइट सिक्वेन्सिंगचा समावेश.
ऑल-न्यू ऑडी क्यू३ मध्ये लेन आणि ओरिएंटेशन लाइटिंग फंक्शन्स सक्षम करण्यासाठी जवळपास ४० मायक्रोमीटर आकाराचे २५,६०० स्वतंत्र मायक्रो-एलईडी असलेले प्रगत मायक्रो-एलईडी तंत्रज्ञान आहे.
मागील बाजूस एलईडी रिअर लाइट्स प्रो आणि इल्यूमिनेटेड ऑडी रिंग्ज.
स्पोर्टी लूकसाठी ४५.७२ सेमी (आर१८) आकाराचे ब्लॅक, ग्लॉस-टर्न फिनिशमधील पाच-आर्म एरो अलॉय व्हील्स.
अधिक सोयीसाठी ऑटो-डिमिंग आणि मेमरी फंक्शनसह पॉवर-अॅडजस्टेबल, हीटेड आणि फोल्डिंग एक्सटीरियर मिरर्स.
केबिनमधील मोकळेपणाच्या अनुभवासाठी पॅनोरॅमिक सनरूफ.
एक्सटीरियर मिरर्समध्ये इंटिग्रेटेड प्रोजेक्शन लाइट.
रंग:
पाच एक्सटीरियर कलर्स: सेज ग्रीन, मिथॉस ब्लॅक, ग्लेशियर व्हाईट, नव्हेरा ब्लू आणि तंबोरा ग्रे.
दोन इंटेरियर कलर थीम्स: टॅमरिंड ब्राऊन आणि पर्गामेंट बेज.
इंटेरियर आणि इन्फोटेनमेंट:
कनेक्टेड डिजिटल कॉकपिट अनुभवासाठी ३०.२२ सेमी ऑडी व्हर्च्युअल कॉकपिट आणि ३२.५१ सेमी सेंट्रल एमएमआय टच डिस्प्लेसह डिजिटल स्टेज पॅनोरॅमिक डिस्प्ले.
ड्रायव्हरला अधिक स्पष्ट माहिती मिळण्यासाठी हेड-अप डिस्प्ले.
स्पोर्टी ड्रायव्हिंगसाठी मल्टिफंक्शन कंट्रोल्स आणि शिफ्ट पॅडल्ससह ट्विन-स्पोक, फ्लॅट टॉप आणि बॉटम असलेले लेदर स्टिअरिंग व्हील.
गिअर सिलेक्टर, लाइटिंग आणि वायपर फंक्शन्स एकत्र आणणारे नवीन इंटिग्रेटेड स्विच मॉड्यूल, ज्यामुळे सेंटर कन्सोलमध्ये अधिक जागा मोकळी मिळते.
१२ हाय-परफॉर्मन्स स्पीकर्स, ४२०-वॅट अॅम्प्लिफायर आउटपुट, आणि न्यूट्रल, कॉन्सर्ट, लाउंज, पॉडकास्ट तसेच कस्टमायझेबल प्रोफाईल्ससह सोनोस प्रीमियम साउंड सिस्टीम.
आवाजाचे अधिक चांगल्या प्रकारे इन्सुलेशन व्हावे यासाठी दारांच्या खिडक्यांना फ्रंट अकौस्टिक ग्लेझिंग.
विनासायास कनेक्टिव्हिटीसाठी ऑडी वायरलेस स्मार्टफोन इंटरफेस, वायरलेस चार्जिंग आणि अधिक चार्जिंग क्षमतेसह यूएसबी इंटरफेसेस.
वैयक्तिक आवडीनुसार प्रकाशाच्या अनुभवासाठी ३० वेगवेगळ्या रंगांसह अँबियंट लाइटिंग पॅकेज प्लस.
आराम आणि सोयीसुविधा:
ड्रायव्हर सीटसाठी मेमरी फंक्शनसह पॉवर-अॅडजस्टेबल फ्रंट सीट्स.
प्रीमियम केबिन अनुभवासाठी लेदर/आर्टिफिशियल लेदर अपहोल्स्ट्री.
प्रवासी आणि सामानाच्या सोयीनुसार अॅडजस्ट करता येणारी रिअर-सीट रेक्लाइन आणि स्लाइडिंग सुविधा.
केबिनमधील वैयक्तिक आरामासाठी थ्री-झोन डिलक्स ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल.
सुलभ पार्किंगसाठी रिअर-व्ह्यू कॅमेऱ्यासह पार्क असिस्ट प्लस.
५० मीटर रिव्हर्स-रूट मेमरीसह रिव्हर्सिंग असिस्ट.
कारमध्ये सुलभ प्रवेशासाठी कन्वीनियन्स की.
सामान चढवणे आणि उतरवणे अधिक सोपे व्हावे यासाठी इलेक्ट्रिकली उघडणारे व बंद होणारे बूट लिड.
सुरक्षा आणि तंत्रज्ञान:
प्रवाशांच्या अधिक सुरक्षेसाठी नऊ एअरबॅग्ज.
आरामदायी ड्रायव्हिंगसाठी अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल.
अधिक सुरक्षेसाठी फ्रंट इमर्जन्सी ब्रेक असिस्ट.
लांबच्या प्रवासात उपयुक्त ठरणारे ड्रायव्हर अटेंशन आणि फटीग मॉनिटर.
सीट बेल्ट प्रिटेन्शनर.
चाकांच्या अधिक सुरक्षेसाठी अँटी-थेफ्ट व्हील बोल्ट्स.
ओनरशिप पॅकेजेस्:
२+३ वर्षे विस्तारित वॉरंटीसह २ वर्षांचे कॉम्प्रीहेन्सिव्ह सर्व्हिस व्हॅल्यू पॅकेज.
२+३ वर्षे विस्तारित वॉरंटीसह ५ वर्षांचे कॉम्प्रीहेन्सिव्ह सर्व्हिस व्हॅल्यू पॅकेज.
१५ वर्षांपर्यंत कव्हरेजसह रोडसाइड असिस्टन्स (आरएसए) पॅकेजेस्.
१० वर्षांपर्यंत कव्हरेजसह सर्व्हिस प्लॅन पॅकेजेस्.
१० वर्षांपर्यंत कव्हरेजसह एक्सटेंडेड वॉरंटी पॅकेजेस्.
विविध फायनान्सर्सकडून दीर्घ मुदतीचे फायनान्स पर्याय:
१० वर्षांपर्यंत दीर्घ मुदतीचे कर्ज पर्याय.
बलून ऑफर्स (कमी ईएमआय).
विविध अॅश्युअर्ड बायबॅक ऑफर्स.


