पुणे, दि.२१: पुणे शिक्षक व पदवीधर मतदार संघाची निवडणूक शुक्रवार दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत होणार आहे. त्या अनुषंगाने खाजगी आस्थापना, खाजगी कंपन्या,मॉल्स, दुकाने व आस्थापना इत्यादी ठिकाणी काम करणाऱ्या या निवडणुकीसाठी पात्र असलेल्या मतदारांना चार तासांची विशेष सवलत देणे आस्थापनावर बंधनकारक आहे.
ही सवलत पगारी असेल. त्याबाबत कोणतेही वेतन कपात करण्यात येऊ नये. याबाबत कोणतीही तक्रार असल्यास कामगारांनी कामगार उप आयुक्त पुणे यांच्या कार्यालयातील dyclpune २०२१@gmail.comया मेलवर तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन सहायक कामगार आयुक्त सु.तु. शिर्के यांनी केले आहे.
००००


