Thursday, October 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedअ क्वांटम व्हिजन थ्रू रंगावली’ चित्रप्रदर्शनातून कला आणि विज्ञानाचा अनोखा संगम

अ क्वांटम व्हिजन थ्रू रंगावली’ चित्रप्रदर्शनातून कला आणि विज्ञानाचा अनोखा संगम

 

 

पुणे, 22 ऑक्टोबर २०२६ : चित्रसूत्र आर्ट स्टुडिओ,पुणे यांच्या वतीने ‘अ क्वांटम व्हिजन थ्रू रंगावली’ या विशेष चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सुनील बलकवडे आणि डॉ. भारती माटे यांच्या कलाकृतींचा समावेश असलेले हे प्रदर्शन २३ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत औंध येथील पीएनजी अँड सन्स आर्ट गॅलरीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

 

या प्रदर्शनात रंगावली या पारंपरिक कलाप्रकाराची सांगड क्वांटम विचारांशी घालण्यात आली आहे. कॅनव्हासवर साकारलेल्या ड्राय फ्रेस्को (भिंतीच्या सुकलेल्या प्लास्टर वर रंगद्रव्य लावून चित्र काढण्याची पद्धती) चित्रांच्या माध्यमातून कलाकारांनी परंपरागत कलेतून आधुनिक विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कला, परंपरा आणि विज्ञान यांच्यातील वेगळे संबंध शोधण्याची संधी या प्रदर्शनातून कलाप्रेमींना मिळणार आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते होणार आहे.

 

या चित्रांमधून प्रेक्षकांना कलाकृतींकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची आणि त्यातील वेगळेपण अनुभवण्याची संधी मिळेल. तसेच, कलाप्रेमी आणि संग्राहकांना या कलाकृती खरेदी करण्याची संधीही उपलब्ध होणार आहे.

 

हे प्रदर्शन १ नोव्हेंबरपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार

आहे.

 

 

—

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments