Friday, October 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedडॉ. डी. वाय. पाटील यांच्या स्मृतींचे जिवंत स्मारक येरवड्यात साकारणार! वडिलांच्या...

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या स्मृतींचे जिवंत स्मारक येरवड्यात साकारणार! वडिलांच्या जयंतीनिमित्त डॉ अजिंक्य डी वाय पाटील यांची अनोखी आदरांजली; कारागृह उद्योग विक्री केंद्राचे भूमिपूजन

पुणे : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना सामाजिक कार्यातून उजाळा देण्याचा विधायक उपक्रम डॉ अजिंक्य डी वाय पाटील यांनी हाती घेतला आहे. येरवडा कारागृहात उभारण्यात येणाऱ्या महाराष्ट्र कारागृह उद्योग विक्री केंद्राचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. अजिंक्य डीवाय. पाटील विद्यापीठाच्या वतीने हा प्रकल्प साकारत आहे.

 

वडिलांच्या जयंतीनिमित्त केवळ औपचारिक अभिवादन न करता त्यांच्या स्मृतीत समाजोपयोगी उपक्रम उभारण्याचा निर्णय डॉ अजिंक्य पाटील यांनी घेतला. कारागृह उद्योगांमध्ये तयार होणाऱ्या उत्पादनांना विक्रीचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि कैद्यांच्या कौशल्याला प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. या सोहळ्याला महाराष्ट्राचे अपर पोलीस महासंचालक तथा कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक सुहास वारके, येरवडा कारागृहाचे अधीक्षक सुनील धमाळ, महिला कारागृहाच्या अधीक्षक पल्लवी कदम, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार जैन, कुलसचिव डॉ. सुधाकर शिंदे, अधिष्ठाता डॉ. अभिलाषा माने, डॉ. सचिन राजस, मुख्य वित्त अधिकारी बाळासाहेब खुणे आणि उपस्थित होते. माहेर महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा विद्या म्हात्रे यांच्या समन्वयाने हा कार्यक्रम पार पडला.

 

शिक्षण आणि सामाजिक कार्यातून पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी निर्माण केलेला वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न या उपक्रमातून होत आहे. वडिलांच्या स्मृतींना केवळ शब्दांतून नव्हे, तर समाजोपयोगी कार्यातून अभिवादन करण्याच्या डॉ. अजिंक्य पाटील यांच्या उपक्रमाचे सुहास वारके यांनी काैतुक केले.

 

डाॅ. डी. वाय. पाटील (दादा) यांंचा सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालविण्याची ग्वाही डाॅ अजिंक्य पाटील यांनी यावेळी दिली.

 

 

—

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments