Wednesday, October 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्टार हेल्थचा Q2 FY27 मध्ये सामान्यीकृत करोत्तर नफा 70 टक्क्यांनी वाढून ₹390...

स्टार हेल्थचा Q2 FY27 मध्ये सामान्यीकृत करोत्तर नफा 70 टक्क्यांनी वाढून ₹390 कोटींवर; अंडररायटिंग नफ्यात सलग पाचव्या तिमाहीत सुधारणा

 

चेन्नई, ऑक्टोबर २८, २०२६: स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (“स्टार हेल्थ”) या भारतातील सर्वात मोठ्या स्वतंत्र आरोग्य विमा कंपनीने आज ३० सप्टेंबर २०२६ रोजी संपलेल्या तिमाही आणि पहिल्या सहामाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीचा सामान्यीकृत करोत्तर नफा (Normalised PAT) आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या दुसऱ्या तिमाहीत वार्षिक आधारावर ७० टक्क्यांनी वाढून ३९० कोटी रुपयांवर पोहोचला आहे.अंडररायटिंग नफ्यात सकारात्मक बदल झाला असून कंपनीने आर्थिक वर्ष २०२६ च्या दुसऱ्या तिमाहीतील ४० कोटी रुपयांच्या तोट्यावरून आर्थिक वर्ष २०२७ च्या दुसऱ्या तिमाहीत ९९ कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे.

कंपनीचा आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या सहामाहीतील अंडररायटिंग नफा आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या सहामाहीतील २४ कोटी रुपयांच्या तोट्यावरून सकारात्मक बदल नोंदवत २१० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या सहामाहीतील हा अंडररायटिंग नफा आर्थिक वर्ष २०२६ च्या संपूर्ण वर्षातील १९८ कोटी रुपयांच्या अंडररायटिंग नफ्यापेक्षा अधिक राहिला आहे.

आर्थिक वर्ष २०२७ च्या दुसऱ्या तिमाहीतील कामगिरीची ठळक वैशिष्ट्ये

व्यावसायिक कामगिरी

जीडब्ल्यूपी (रिपोर्टेड 1/N आधारावर) वार्षिक आधारावर १९ टक्‍के वाढून ५,२७५ कोटी रुपयांवर पोहोचला.

रिटेल हेल्थ फ्रेश जीडब्ल्यूपी (रिपोर्टेड 1/N आधारावर) वार्षिक आधारावर ३५ टक्‍के वाढला.

आर्थिक कामगिरी

अंडररायटिंग नफा: आर्थिक वर्ष २०२६ च्या दुसऱ्या तिमाहीतील ४० कोटी रुपयांच्या तोट्याच्या तुलनेत ९९ कोटी रुपयांवर पोहोचला.

सामान्यीकृत करोत्तर नफा (Normalised PAT): ₹३९० कोटी (वार्षिक ७०% वाढ | आर्थिक वर्ष २०२५-२६ ची दुसरी तिमाही: ₹२२९ कोटी)

करोत्तर नफा (पीएटी): २६५ कोटी रुपये (वार्षिक आधारावर २३३ टक्‍के वाढ | आर्थिक वर्ष २०२६ ची दुसरी तिमाही: ८० कोटी रुपये).

कम्बाइन्ड इन्शुरन्स सर्व्हिस रेशो (सीआयएसआर): ९८.० टक्‍के (आर्थिक वर्ष २०२६ च्या दुसऱ्या तिमाहीतील १००.९ टक्क्यांच्या तुलनेत २.९ टक्‍के सुधारणा)

आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या सहामाहीतील कामगिरीची ठळक वैशिष्ट्ये

व्यावसायिक कामगिरी

जीडब्ल्यूपी (रिपोर्टेड 1/N आधारावर) वार्षिक आधारावर १९ टक्‍के वाढून ९,५६२ कोटी रुपयांवर पोहोचला.

रिटेल हेल्थ फ्रेश जीडब्ल्यूपी (रिपोर्टेड 1/N आधारावर) वार्षिक आधारावर ३६ टक्‍के वाढला.

आर्थिक कामगिरी

अंडररायटिंग नफा: आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या सहामाहीतील २४ कोटी रुपयांच्या तोट्याच्या तुलनेत २१० कोटी रुपयांवर पोहोचला.

करोत्तर नफा (पीएटी ): ८१५ कोटी रुपये (वार्षिक आधारावर ५७ टक्‍के वाढ | आर्थिक वर्ष २०२६ ची पहिली तिमाही: ५१८ कोटी रुपये).

कम्बाइन्ड इन्शुरन्स सर्व्हिस रेशो (सीआयएसआर): ९७.९ टक्‍के (आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या सहामाहीतील १००.३ टक्क्यांच्या तुलनेत २.४ टक्‍के सुधारणा)

कंपनी आपल्या ‘नॉर्मलाइज्ड पीएटी’ संरचनेच्या माध्यमातून नफ्याचा मागोवा घेते, जी अल्पकालीन मार्क-टू-मार्केट अस्थिरतेपासून दूर राहून मूलभूत नफ्याचे चित्र स्पष्ट करण्यासाठी ८ टक्‍के सामान्यीकृत वार्षिक गुंतवणूक परताव्याशी जोडलेली आहे. आर्थिक वर्ष २०२७ च्या दुसऱ्या तिमाहीतील नॉर्मलाइज्ड करोत्तर नफा (पीएटी) वार्षिक आधारावर ७० टक्‍के वाढून ३९० कोटी रुपयांवर पोहोचला, तर आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या सहामाहीसाठी वार्षिक आधारावर ५६ टक्‍के वाढून ७७५ कोटी रुपये झाला.

दावा पूर्ततेतील उत्कृष्टता आणि ग्राहकांचा विश्वास

स्टार हेल्थने आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या सहामाहीत २२.५ लाख दावे निकाली काढले.

आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या सहामाहीत रिटेल क्लेम्स सेटलमेंट रेशो १.४ टक्क्यांनी सुधारून ९२.४ टक्क्यांवर पोहोचला.

पर्सिस्टन्सी वार्षिक आधारावर ४ टक्‍के सुधारून १०२ टक्‍के झाली.

कंपनीचा नेट प्रमोटर स्कोअर (एनपीएस) ४ अंकांनी वाढून ६५ झाला.

कंपनीने अचूकता, कार्यक्षमता आणि ग्राहकांचा अनुभव अधिक उंचावण्याच्या उद्देशाने एआय/एमएल-सक्षम अॅनालिटिक्स, नेटवर्क व्यवस्थापन, वेलनेस उपक्रम, टेलिकन्सल्टेशन आणि तंत्रज्ञानाधारित क्लेम प्रोसेसिंगच्या माध्यमातून आपली क्लेम परिसंस्था अधिक दृढ करणे सुरू ठेवले आहे.

डिजिटल-केंद्रित दृष्टीकोन

या तिमाहीत डिजिटल माध्यम वाढ आणि कार्यक्षमता या दोन्हीसाठी महत्त्वाचा घटक राहिले. कंपनीचे स्वतःचे डिजिटल डी२सी चॅनल सर्वात वेगाने वाढणारे चॅनल ठरले, ज्यामध्ये तरुण ग्राहक, विम्याची उच्च रक्कम आणि मेट्रो शहरांच्या पलीकडील वाढता सहभाग यांमुळे आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या सहामाहीत वार्षिक आधारावर १३७ टक्‍के वाढ नोंदवली गेली.

कंपनीच्या रिटेल वितरण संरचनेत डिजिटलचा सखोल वापर दिसून येत असून ९७ टक्‍के नवीन पॉलिसी डिजिटल पद्धतीने मिळवण्यात आल्या आहेत.

या तिमाहीदरम्यान, कंपनीने आपले ग्राहक संबंध व्यवस्थापन प्लॅटफॉर्म सेल्सफोर्समध्ये अपग्रेड केले, ज्यामुळे डी२सीमधील लीड व्यवस्थापन आणि रूपांतरण अधिक गतिमान झाले. तसेच ग्राहक संपादन व सेवेमध्ये एआय-सक्षम बॉट्सचा वापर वाढवला. आता ५० टक्क्यांहून अधिक सक्रिय एजंट्स कंपनीचे एआय-सक्षम वितरण प्लॅटफॉर्म अॅटम प्रो वापरतात. स्टार हेल्थ ग्राहक अॅपने १७ दशलक्षहून अधिक डाऊनलोड्सचा टप्पा ओलांडला आणि अॅपचे मासिक १.५ दशलक्ष सक्रिय वापरकर्ते आहेत. दाव्यांच्या बाबतीत फसवणूक आणि अपव्यय शोधण्याची अचूकता वाढवत आता ९६ टक्‍के दावे कंपनीच्या नवीन एआय-सक्षम प्लॅटफॉर्मवर प्रक्रिया केले जातात.

वितरण क्षमता

स्टार हेल्थच्या स्वतःच्या वितरण व्यवस्थेने वाढ कायम राखली आहे, तसेच आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या सहामाहीत एकूण जीडब्ल्यूपीमध्ये एजन्सी आणि डिजिटल डी२सीचा एकत्रित वाटा ९० टक्क्यांपेक्षा जास्त राहिला आहे. कंपनीने या सहामाहीत ३९,००० एजंट्स जोडले, ज्यामुळे कंपनीची एजन्सी संख्या ८.७ लाखांवर पोहोचली आहे, जी स्वतंत्र आरोग्य विमा कंपन्यांमध्ये सर्वाधिक आहे. तसेच एजंट्सच्या उत्पादकतेत वार्षिक आधारावर १९ टक्‍के वाढ झाली. ९३ टक्‍के नवीन व्यवसाय पहिल्यांदाच आरोग्य विमा घेणाऱ्या ग्राहकांकडून आला, तर नॉन-मेट्रो शहरांचे नवीन व्यवसायातील प्रमाण ६५ टक्क्यांपेक्षा जास्त राहिले.

सीईओंचे मत

कंपनीच्या कामगिरीबाबत मत व्यक्त करत स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर श्री. आनंद रॉय म्हणाले:

“आर्थिक वर्ष २०२७ ची दुसरी तिमाही अंडररायटिंग निकालांमधील सुधारणेची सलग पाचवी तिमाही ठरली आहे आणि या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीतील आमचा अंडररायटिंग नफा संपूर्ण मागील वर्षाच्या नफ्यापेक्षा अधिक राहिला आहे. ही कामगिरी शिस्तबद्ध जोखीम निवड, जोखमीवर आधारित किंमत निर्धारण, अधिक काटेकोर दावे व्यवस्थापन, सेवा प्रदात्यांसोबत दृढ संबंध आणि वेलनेस उपक्रमांचा विस्तार यांसारख्या संरचनात्मक घटकांना सादर करते. आमची स्वतःची वितरण व्यवस्था बाजारपेठेचा विस्तार सातत्याने करत असून पहिल्यांदाच आरोग्य विमा घेणाऱ्या ग्राहकांना जोडत आहे. एआय आणि डिजिटल क्षमतांमधील धोरणात्मक गुंतवणुकीमुळे गती, अचूकता आणि ऑपरेशनल कार्यक्षमता वाढत आहे, ज्यामुळे आम्ही विस्तार करत आहोत, तसतसे ही गुंतवणूक ऑपरेटिंग लीव्हरेजचा महत्त्वपूर्ण स्रोत ठरत आहे. आम्ही पूर्ण आत्मविश्वासाने वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत प्रवेश करत आहोत, तसेच ग्राहक आणि भागधारक या दोघांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करणारी सक्षम फ्रँ

चायझी उभारण्यासाठी कटिबद्ध आहोत.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments