Thursday, October 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedदांडेकर पुलाजवळील PMPML च्या मोक्याच्या आरक्षित जागेबाबत

दांडेकर पुलाजवळील PMPML च्या मोक्याच्या आरक्षित जागेबाबत

 

 

: दांडेकर पुलाजवळील PMPML च्या मोक्याच्या आरक्षित जागेबाबत – जुनी NOC रद्द करून जागा ताब्यात घेण्यात यावी अशी मागणी माजी मनपा विरोधी पक्षनेते उज्वल केसकर, सुहास कुलकर्णी , प्रशांत बधे आणि मुकारी अलगुडे यांनी पीएमपीएमएलचे मुख्य कार्यकारी संचालक महेश आव्हाड यांच्याकडे केली आहे . त्यासंदर्भातील निवेदनात म्हटले आहे की

 

 

दांडेकर पुलाजवळ मोक्याच्या ठिकाणी PMPML चे आरक्षण असलेली जागा आहे (सर्व्हे नं 583, 585 – PMPML 3 व 4).

 

आपल्या पूर्वसुरींनी ही आरक्षित जागा बिल्डर यांनी विकसित करण्यास NOC देऊन परवानगी दिली होती. सध्या बसेस उभ्या करण्यासाठी PMPML ला जागेची अत्यंत आवश्यकता आहे.

 

सदरील जागेसाठी केवळ NOC देण्यात आलेली आहे, अद्याप नकाशे मंजूर झालेले नाहीत तसेच जागेवर कोणतेही बांधकाम झालेले नाही. अशा परिस्थितीत आपण पूर्वी दिलेली जुनी NOC रद्द करून सदर जागा PMPML च्या ताब्यात घ्यावी आणि भविष्यकाळासाठी उपयोग करावा. सोबत नकाशा जोडत आहोत.या निवेदनाची प्रत मनपा आयुक्तांना देण्यात आली आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments