Thursday, October 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedमौलाना उस्मान रहमानी यांच्याकडून युनायटेड मायनॉरिटी कौन्सिलच्या (युएमसी) व्यसनमुक्ती मोहिमेचे कौतुक; व्यसनमुक्त...

मौलाना उस्मान रहमानी यांच्याकडून युनायटेड मायनॉरिटी कौन्सिलच्या (युएमसी) व्यसनमुक्ती मोहिमेचे कौतुक; व्यसनमुक्त समाजासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

 

 

पुणे,२९ ऑक्टोबर २०२६  : पुणे आणि महाराष्ट्राला व्यसनमुक्त करण्यासाठी युनायटेड मायनॉरिटी कौन्सिलने (युएमसी) हाती घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक करताना पंजाबचे शाही इमाम मौलाना मोहम्मद उस्मान रहमानी लुधियानवी म्हणाले की, व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी कुटुंब, धार्मिक संस्था आणि समाजातील सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे.

 

उपस्थितांना मार्गदर्शन करताना मौलाना रहमानी म्हणाले की, व्यसनाधीनतेचा परिणाम केवळ संबंधित व्यक्तीच्या आरोग्यावर आणि भविष्यावर होत नाही, तर त्याचे संपूर्ण कुटुंबही त्याचे दुष्परिणाम भोगते. त्यामुळे व्यसनाधीन व्यक्तींना समाजापासून दूर लोटण्याऐवजी त्यांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे. व्यसनमुक्तीसाठी समाजात जनजागृती करण्याबरोबरच गरजू व्यक्तींसाठी उपचार आणि पुनर्वसनाची व्यवस्थाही उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

 

ते म्हणाले, “व्यसनाचा तिरस्कार करा, व्यसन करणाऱ्या माणसाचा नाही. व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तींना प्रेम, आपुलकी आणि योग्य मार्गदर्शनाची गरज असते. समाजातील जबाबदार व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबीयांनी एकत्र येऊन ही सामाजिक समस्या दूर करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.”

 

त्यांनी सांगितले की, चांगले आचरण, माणुसकी, प्रेम आणि सेवाभाव यांच्या माध्यमातून समाजात विश्वास निर्माण केला पाहिजे. आई-वडिलांची सेवा, ज्येष्ठांचा आदर, कुटुंबाप्रती असलेली जबाबदारी आणि सर्व धर्मीयांशी सलोख्याचे संबंध राखणे महत्त्वाचे आहे. तरुणांनी व्यसनांपासून आणि वाईट सवयींपासून दूर राहून आपल्या आयुष्याला सकारात्मक दिशा द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

 

या कार्यक्रमादरम्यान मौलाना रहमानी यांनी शहरातील विविध धार्मिक व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि उलेमा यांच्याशी संवाद साधून समाजाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. कार्यक्रमात महिलांसाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

 

यावेळी व्यासपीठावर मुफ्ती अलीम , मौलाना जाकीर , मुफ्ती अब्दुल मुक्तदीर , हाफिज सलाहुद्दीन, मौलाना शकील वडगावशेरी, मौलाना झैद , मौलाना मुझम्मिल , मुफ्ती जलाल, काती इनाम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

युनायटेड मायनॉरिटी कौन्सिलने (युएमसी) पुणे आणि महाराष्ट्राला व्यसनमुक्त करण्यासाठी हा महत्वाचा उपक्रम सुरू केला आहे. युएमसीच्या टीममध्ये मोहम्मद सलीम, अनिस शेख, अली इनामदार, ॲड.अफरोज मुल्ला, हबीब शेख, खालिद अत्तार, मुझम्मिल शेख, समीर शेख, अबुल रहमान, ॲड.अबरार खान, फिरोज बेग, नासीर अपराध, आरिफ तांबोळी, इमरान खान, ॲड. सलमान आदींचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments