Friday, October 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedआयएसबीएम कॉलेज ऑफ इंजिनियरिंगच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा स्तुत्य उपक्रम: रक्तदान शिबिरात 257...

आयएसबीएम कॉलेज ऑफ इंजिनियरिंगच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा स्तुत्य उपक्रम: रक्तदान शिबिरात 257 युनिट रक्ताचे संकलन

 

 

 

पुणे,दि.३०:आयएसबीएम कॉलेज ऑफ इंजिनियरिंगच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आणि स्वयंसेवकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. या शिबिरात तरुणांनी दाखवलेल्या उत्स्फूर्त सहभागामुळे तब्बल 257 युनिट रक्त जमा करण्यात यश आले.

 

नांदे येथील आयएसबीएम कॉलेज ऑफ इंजिनियरिंग येथे नुकताच रक्तदान शिबिराचा प्रेरणादायी आणि समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आला.

आय एस बी अँड एमचे अध्यक्ष डॉ. प्रमोद कुमार व कॉलेजचे प्राचार्य डॉ. पी. के. श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर संपन्न झाला.

 

कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. ए. एम. सपकाळ, एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. सीताराम लोंगाणी, ॲडमिन विभागाचे प्रशासकीय अधिकारी वैभव कामठे, दीपक वाघ यांच्यासह एनएसएसचे सर्व विद्यार्थी व स्वयंसेवक उपस्थित होते.

 

स्वेच्छेने रक्तदानाचे महत्त्व पटवून देणे आणि मौल्यवान मानवी जीवन वाचवण्यासाठी तरुण पिढीला पुढे येण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपली सामाजिक बांधिलकी उत्तमरीत्या जपली. तसेच समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

या संपूर्ण यशस्वी आयोजनात महाविद्यालयाचे संचालक, प्राध्यापक व प्रशासकीय यंत्रणेचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. हा उपक्रम संस्थेच्या उच्च सामाजिक जाणिवा आणि समाजकल्याणप्रती असलेली कटिबद्धता स्पष्टपणे अधोरेखित करतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments