Friday, October 30, 2026
Google search engine
HomeUncategorized*विश्व हिंदू परिषदेतर्फे मंदिर स्वच्छता महाअभियान आजपासून (दि.३१)* मंदिर एवं अर्चक...

*विश्व हिंदू परिषदेतर्फे मंदिर स्वच्छता महाअभियान आजपासून (दि.३१)* मंदिर एवं अर्चक पुरोहित संपर्क आयाम पश्चिम महाराष्ट्र प्रांततर्फे आयोजन

 

 

पुणे : मंदिर हे आपल्या श्रद्धेचे, संस्कारांचे आणि सामाजिक एकतेचे केंद्र आहे. मंदिराचे पावित्र्य जपण्यासोबतच मंदिर व त्याचा परिसर स्वच्छ, सुंदर आणि प्रसन्न ठेवणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे विश्व हिंदू परिषद, मंदिर एवं अर्चक पुरोहित संपर्क आयाम, महाराष्ट्र–गोवा तर्फे मंदिर स्वच्छता महाअभियान दि. ३१ ऑक्टोबर व १ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती आयामाचे प्रांत प्रमुख धनाजी शिंदे यांनी दिली.

 

माझे मंदिर, माझी जबाबदारी या भावनेतून प्रत्येक भक्ताने मंदिराच्या सेवेत सहभागी व्हायचे आहे. दोन्ही दिवस आपल्या परिसरातील मंदिरात सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत हे अभियान सुरु राहणार आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील एक किंवा अधिक मंदिरांची निवड करून मंदिराचे विश्वस्त, पुजारी व व्यवस्थापन यांच्या संमतीने स्वच्छतेचे नियोजन करावे. तसेच आपल्या संस्थेचे सदस्य, सत्संगातील साधक, युवक-युवती, महिला आणि परिसरातील भाविकांना श्रमदानासाठी सहभागी करून घ्यावे.

 

प्रांत सहप्रमुख समीर घरोटे म्हणाले, मंदिर परिसराची झाडलोट, जाळी काढणे, फरशी व प्रवेशद्वार स्वच्छ करणे, पूजेची भांडी आणि अन्य साहित्याची स्वच्छता करावी. गर्भगृह व धार्मिक वस्तूंची स्वच्छता मंदिराच्या परंपरेनुसार आणि अधिकृत व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली करावी. तसेच झाडू, ब्रश, बादल्या, कापड, हातमोजे आणि कचऱ्याच्या पिशव्या यांची व्यवस्था करावी. निर्माल्य, ओला व सुका कचरा वेगळा करून योग्य विल्हेवाट लावावी. अभियानानंतरही मंदिराची नियमित स्वच्छता राखण्यासाठी स्थानिक सेवागट तयार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments