या सणासुदीच्या काळात घर खरेदीदारांसाठी कॅसाग्रांडेची खास iPhone 18 प्रो ऑफर
पुणे, 30 ऑक्टोबर 2026 : भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपर्सपैकी एक असलेल्या कॅसाग्रँडने पुण्यातील अप्पर खराडी परिसरातील आपल्या प्रीमियम निवासी प्रकल्प ‘कॅसाग्रँड कॅलेडियम’मध्ये घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी सणासुदीची खास ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरअंतर्गत घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कंपनीकडून एक नवीन iPhone18 प्रो भेट म्हणून देण्यात येणार आहे. कॅसाग्रँड कॅलॅडियममध्ये आकर्षक पद्धतीने तयार केलेली घरे असून, येथे आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. तसेच, प्रमुख आयटी पार्क, शाळा आणि मनोरंजनाच्या ठिकाणांशी या प्रकल्पाची उत्तम कनेक्टिव्हिटी आहे.
सणासुदीचा काळ हा कुटुंबांसाठी नवीन सुरुवात करण्यासाठी आणि स्वतःचे घर घेण्यासारखे महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी असतो. हीच सणासुदीच्या भेटवस्तू देण्याची भावना लक्षात घेऊन कॅसाग्रँडने घर खरेदीच्या या आनंदाच्या क्षणाला आणखी खास बनवण्यासाठी ग्राहकांना एक प्रीमियम जीवनशैलीची भेटवस्तू देण्याची घोषणा केली आहे. दर्जेदार बांधकाम, विचारपूर्वक डिझाइन केलेल्या घरांची रचना, नामांकित ब्रँडच्या वस्तू आणि आधुनिक जीवनशैलीसाठी आवश्यक सुविधा ही कॅसाग्रँडच्या घरांची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या गुंतवणुकीचा चांगला फायदा मिळण्यासोबतच जीवनशैलीतही सुधारणा करता येते. या सणासुदीच्या ऑफरमुळे घर खरेदीदारांना त्यांच्या स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी आणखी एक खास कारण मिळणार आहे.
2.8 एकर परिसरात पसरलेला कॅसाग्रँड कॅलेडियम हा सिंगापूरच्या वास्तुकलेपासून प्रेरित असा प्रीमियम निवासी प्रकल्प आहे. या प्रकल्पात आकर्षक पद्धतीने डिझाइन केलेली 2 आणि 3 बीएचके प्रकारातील एकूण 334 प्रशस्त घरे उपलब्ध आहेत. रहिवाशांना अधिक खासगीपणा आणि आरामदायी वातावरण मिळावे, यासाठी प्रत्येक मजल्यावर फक्त चार घरे ठेवण्यात आली आहेत. आधुनिक शहरी जीवनशैलीचा विचार करून या प्रकल्पात आधुनिक शहरी जीवनशैलीचा विचार करून 110 हून अधिक सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये छतावरील 1,800 चौरस फुटांचा इन्फिनिटी स्विमिंग पूल, 13,500 चौरस फुटांचे क्लब हाऊस तसेच आरोग्य, खेळ, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सोयीसुविधांचा समावेश आहे.
हा प्रकल्प महाराष्ट्र रेरा (MahaRERA) अंतर्गत नोंदणीकृत असून त्याचा नोंदणी क्रमांक P52100080302 आहे. या विशेष ऑफरअंतर्गत उपलब्ध असलेल्या घरांची माहिती घेण्यासाठी ग्राहक कॅसाग्रँडच्या कोणत्याही प्रकल्पाच्या ठिकाणी भेट देऊ शकतात किंवा www.casagrand.co.in या वेबसाइटला भेट देऊ शकतात. ही खास ऑफर 2 नोव्हेंबर 2026 पर्यंत लागू
आहे.


