नवी दिल्ली, 10 एप्रिल 2024: ओट्स विभागातील भारतातील आघाडीचे नेतृत्व क्वेकर पोषणासाठी कार्यरत आहे. हा ब्रँड त्याच्या ‘बाउल ऑफ ग्रोथ’ उपक्रमाद्वारे 3 प्रमुख स्तंभांद्वारे बालकांच्या कुपोषणाच्या समस्यांवर काम करतो. या तीन स्तंभांमध्ये 3 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांना पोषण पुरवणे, पालक / काळजी घेणाऱ्या व्यक्तींना यांना शिक्षित करणे आणि समाजात जागरूकता पसरवणे. कुपोषण हे चिंतेचे कारण असलेल्या राज्यात, हा विशेष पोषण-केंद्रित कार्यक्रम पुणे व महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील समस्या लक्षात आलेल्या ठिकाणी सुरू करण्यात आला.
सामाजिक जागृतीचा आधारस्तंभ आणखी मजबूत करण्यासाठी, ब्रँडने आपली पहिली लाँग फॉरमॅट ऍड फिल्म ‘डोहाळे जेवण पोषणाची वाटी’ ची सुरूवात केली आहे. भावनिक स्पर्श असलेले कथन केवळ मुलांच्या पोषणासाठी आवश्यक असलेल्या पौष्टिक गरजांची पूर्तता करत नाही तर प्रेक्षकांशी घनिष्ठ संबंध निर्माण करण्यासाठी परंपरा आणि संस्कृती घटकांमध्ये देखील एकत्र आणले जातात.


