Saturday, October 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedएका मोबिलिटी आणि ग्रुप कंपन्यांकडून एका ‘आविर्भाव' सोहळ्यात सहा उत्पादन प्रकल्पांचे उद्घाटन

एका मोबिलिटी आणि ग्रुप कंपन्यांकडून एका ‘आविर्भाव’ सोहळ्यात सहा उत्पादन प्रकल्पांचे उद्घाटन

 

 

केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत एका मोबिलिटी आणि ग्रुप कंपन्यांनी भारताच्या इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहतुकीसाठी ३,५०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीची उत्पादन परिसंस्था सादर केली

 

पुणे, ऑक्टोबर ३०, २०२६: एका मोबिलिटीने पिनाकल इंडस्ट्रीज लिमिटेड आणि आपल्या समूहातील कंपन्यांसह जेडब्ल्यू मॅरियट, पुणे येथे आयोजित ऐतिहासिक ‘एका आविर्भाव’ सोहळ्यात आपल्या सहा नवीन उत्पादन प्रकल्पांचे उद्घाटन केले. या सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, केंद्रीय व राज्यमंत्री, उद्योगातील दिग्गज आणि धोरणात्मक भागीदार एकत्र आले होते, ज्यांनी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील सहा प्रकल्पांचे औपचारिक उद्घाटन केले. हे प्रकल्प एकत्रितपणे भारतातील इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांसाठी सर्वात मोठे एकात्मिक उत्पादन प्लॅटफॉर्म्स बनले आहेत.

 

हे उद्घाटन कंपनीच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर झाले आहे. आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या सहामाहीत एका मोबिलिटीने वार्षिक आधारावर १,२४३ टक्के, म्हणजेच १३ पटींपेक्षा जास्त वाढ नोंदवली आहे. आविर्भावने या विकासाला सातत्य देण्यासाठी आवश्यक असलेला प्रबळ उत्पादन पाया तयार केला आहे.

 

महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, माननीय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी, माननीय केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री श्री. एच. डी. कुमारस्वामी, महाराष्ट्राच्या माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटना) श्री. बी. एल. संतोष, माननीय केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री श्री. मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील आणि फोर्स मोटर्स लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया यांच्या हस्ते या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले.

 

या इव्हेण्टबाबत मत व्यक्त करत एका मोबिलिटी आणि ग्रुप कंपन्यांचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. सुधीर मेहता म्हणाले: “एका आविर्भाव भारतात रुजलेली, भविष्यासाठी-सुसज्ज आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक उत्पादन परिसंस्था उभारण्याच्या आमच्या प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्पा आहे. आमच्या समूहातील सहा उत्पादन प्रकल्पांचे उद्घाटन हे नाविन्यता, स्वदेशी अभियांत्रिकी, शाश्वत मोबिलिटी आणि उत्कृष्ट उत्पादनाप्रती आमची अतूट कटिबद्धता दर्शवते. हे प्रकल्प केवळ पायाभूत सुविधा नसून जागतिक दर्जाच्या क्षमता निर्माण करणे, अर्थपूर्ण रोजगार मिळवून देणे, टॅलेंटला वाव देणे आणि भारताला जागतिक मॅन्युफॅक्चरिंग पॉवरहाऊस बनवण्यात योगदान देण्याच्या आमच्या दृष्टीकोनाचे प्रतीक आहेत. हे महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकत असताना आमचे लक्ष आमच्या ग्राहकांसाठी, राष्ट्रासाठी आणि भावी पिढ्यांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करणाऱ्या परिवर्तनीय मोबिलिटी सोल्यूशन्स देण्यावर केंद्रित आहे.”

 

संस्कृतमध्ये एका म्हणजे एक, आणि आविर्भाव म्हणजे उदय, प्रकटीकरण किंवा एखाद्या नव्या गोष्टीचे अस्तित्वात येणे. एका आविर्भाव #BharatKiEKA उदयाचा क्षण अधोरेखित करतो, ज्यामुळे दीर्घकाळापासूनचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार झाले आहे. हा सोहळा अनेक वर्षांच्या उभारणी, गुंतवणूक आणि अभियांत्रिकीचा सुवर्णमहोत्सव आहे, ज्यामुळे भारताच्या इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांच्या भविष्यासाठी उत्पादन परिसंस्था प्रत्यक्षात आली आहे.

 

एका मोबिलिटी आणि ग्रुप १२० एकरांमध्ये पसरलेल्या ११ उत्पादन प्रकल्पांचे संचालन करतो, त्यापैकी ६ प्रकल्पांचे उद्घाटन एका आविर्भावमध्ये झाले आहे, ज्यामध्ये दरवर्षी ४०,००० हून अधिक इलेक्ट्रिक वेईकल्स निर्माण करण्याची क्षमता आहे. या परिसंस्थेच्या उभारणीसाठी ग्रुपने ३,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे, जी देशातील व्यावसायिक इलेक्ट्रिक वेईकल्समधील सर्वात मोठी गुंतवणूक आहे. तसेच संशोधन आणि विकासासाठी (आरअँडडी) ६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्यात आली आहे. एकाकडे ३०० हून अधिक बौद्धिक संपदा अधिकार असून भारतात इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांची सर्वात मोठी श्रेणी उपलब्ध करून देते, ज्यामध्ये ३,००० हून अधिक वाहने आधीच रस्त्यांवर धावत आहेत आणि संपूर्ण ग्रुपमध्ये ६,००० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. या ११ प्रकल्पांद्वारे एकाला आपल्या कामकाजात आणि व्यापक परिसंस्थेत आगामी पाच वर्षांत २.५ लाखांहून अधिक रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे.

 

उद्घाटन झालेले प्रकल्प व्यावसायिक वाहनांच्या उत्पादनाची संपूर्ण मूल्य साखळी व्यापतात, ज्यामध्ये वाहनांचे असेंब्ली, इंटेरियर्स, सुटे भाग आणि विविध यंत्रणांचा समावेश आहे:

1. एका एससीव्ही प्लांट, पुणे: एकाच्या स्मॉल कमर्शियल वेईकल श्रेणीसाठी समर्पित.

2. एका बस अँड ट्रक्स प्लांट, पुणे: कंपनीच्या बस आणि एमअँडएचसीव्ही ट्रक प्लॅटफॉर्मचे केंद्र.

3. व्हीडीएल पिनाकल इंजिनिअरिंग प्लांट, पुणे: ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंगवर लक्ष केंद्रित असलेला हा प्रकल्प व्हिडीओएल ग्रुप (नेदरलँड्स) आणि पिनाकल इंडस्ट्रीज यांचा संयुक्त उपक्रम आहे.

4. इन्स्टोर इंडिया प्लांट, पुणे: रिटेल स्टोअर फिक्स्चर्स, डिस्प्ले आणि स्टोरेज सोल्यूशन्ससह ईव्ही बस बॉडी स्ट्रक्चर्स आणि आयपी६७-रेटेड बॅटरी एन्क्लोजर्स यांसारख्या ऑटोमोटिव्ह भागांचे उत्पादन करतो.

5. पिनाकल सीटिंग अँड इंटेरियर्स प्लांट, पुणे: पश्चिम विभागासाठी सीटिंग, इंटेरियर्स आणि घटकांसाठी समर्पित.

6. पिनाकल इंटेरियर्स प्लांट, पीथमपूर: मूळ कंपनीचा सर्वात मोठा प्रकल्प, जो बसेस, ट्रेन्स, ट्रॅक्टर्स, अॅम्ब्युलन्स, मोटरहोम्स आणि कस्टमाइज्ड वाहनांच्या सीटिंग सिस्टीम्स व इंटेरियर्ससाठी समर्पित आहे.

 

 

एका मोबिलिटीने देशात बसेस, लहान व्यावसायिक वाहने आणि मध्यम व अवजड व्यावसायिक ट्रक्सची सर्वात विस्तृत आणि सर्वसमावेशक इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहन श्रेणी डिझाइन केली आहे. कंपनी भारत सरकारच्या ऑटोमोटिव्ह पीएलआय योजनेअंतर्गत चॅम्पियन ओईएम आहे, तसेच कंपनीच्या सर्व उत्पादन प्लॅटफॉर्म्सना पीएलआय प्रमाणपत्र मिळालेले आहे.

 

उत्पादनांबाबत मत व्यक्त करत डॉ. मेहता पुढे म्हणाले, “आमचा नेहमी विश्वास राहिला आहे की, व्यावसायिक ईव्ही म्हणजे केवळ वाहने नाही. आमच्या उत्पादन पोर्टफोलिओमधील ही विविधता योगायोगाने आलेली नाही. हा जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय आहे, कारण खरा बदल घडवून आणायचा असेल, तर आम्हाला प्रत्येक भारतीयापर्यंत आणि प्रत्येक प्रवाशापर्यंत पोहोचले पाहिजे. याचा अर्थ मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक, पहिल्या टप्प्यापासून ते अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत मोबिलिटीकडे सर्वांगीण दृष्टीने पाहणे होय.”

 

“सार्वजनिक वाहतूक भारताचा कणा आहे. जोपर्यंत आपण सार्वजनिक वाहतूक सर्वांसाठी सहज उपलब्ध आणि परवडणारी बनवत नाही, तोपर्यंत आपले ध्येय साध्य होणार नाही आणि तंत्रज्ञान दररोज त्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचले नाही, तर त्याला काही अर्थ उरत नाही. आमची उत्पादने, त्यांची कामगिरी आणि त्यांची नफाक्षमता हे शाश्वतता ऑपरेटरसाठी, प्रवाशासाठी आणि देशासाठी कशी फायदेशीर ठरू शकते याचे उत्तम उदाहरण आहे. म्हणून आम्ही हे सर्व प्लांट्स, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान भारतात, भारतासाठी उभारले आहे.”

 

 

या पोर्टफोलिओच्या पाठीशी ग्रुपमधील ६,००० हून अधिक कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ कार्यरत आहे, ज्यामध्ये डिझायनर्स आणि इंजिनिअर्सच्या १,००० सदस्यांच्या प्रबळ आरअँडडी टीमचा समावेश आहे, जी भारतातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहन आरअँडडी यंत्रणा आहे. ही इन-हाउस क्षमता सॉफ्टवेअरपर्यंतही विस्तारलेली आहे. एका कनेक्ट हे कंपनीचे स्वतःचे मालकीचे सॉफ्टवेअर भारतातील एका इंजिनिअर्सनी डिझाइन केले आहे. हे सॉफ्टवेअर रस्त्यावर धावणाऱ्या प्रत्येक वाहनाच्या १,५०० हून अधिक पॅरामीटर्सवर दर अर्ध्या सेकंदाला लक्ष ठेवते, ज्यामुळे कंपनीला आणि त्यांच्या फ्लीट ग्राहकांना वाहनाच्या रस्त्यावरील कामगिरीची सातत्यपूर्ण व सविस्तर माहिती मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा डेटा भारतात सुरक्षित राहतो. राज्य परिवहन उपक्रम, सार्वजनिक ताफे आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी वाहन व परिचालनाचा डेटा देशाच्या हद्दीतच राहतो.

 

हा विस्तार स्वच्छ मोबिलिटी, देशांतर्गत उत्पादन आणि रोजगाराच्या राष्ट्रीय प्राधान्यांनाही पाठबळ देतो. व्यावसायिक वाहने ताफ्यातील उत्सर्जनात मोठा वाटा उचलत असल्याने आणि त्यांचा दैनंदिन वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने या क्षेत्रांना व्यापक महत्त्व आहे.

 

आविर्भावमधून एकाच्या जागतिक महत्त्वांकांक्षा देखील दिसून येतात. कंपनीच्या बसेस झांझिबारमध्ये, तर लहान व्यावसायिक वाहने नेपाळमध्ये आधीच कार्यरत झाली आहेत. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये असेंब्ली प्लांट्स उभारले जात असून कंपनीच्या उत्पादनाची पोहोच भारताबाहेर विस्तारत नवीन भौगोलिक बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यास मदत करत आहेत.

 

एकाकडे १.७ अब्ज अमेरिकन डॉलर्स मूल्याच्या ११,००० हून अधिक बसेसच्या ऑर्डर्स आहेत, तसेच महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मेघालय, ओडिशा आणि अरुणाचल प्रदेशमध्ये या बसेस तैनात केल्या जात आहेत. एकाच्या इलेक्ट्रिक एससीव्हींनी प्रवासी वाहतूक, लास्ट-माईल डिलिव्हरी आणि मालवाहतूक क्षेत्रात देशभरात १,५०० हून अधिक विक्रीची नोंद केली आहे.

 

ग्राहकांना वाहनांची विनासायास मालकी अनुभवता यावी यासाठी खास डिझाइन केलेल्या, संपूर्ण भारतात पसरलेल्या ७५ हून अधिक ३एस (सेल्स, सर्व्हिस आणि स्पेअर्स) डीलरशिप्सच्या प्रबळ पाठिंब्यासह एका ग्राहकांना वाहनांच्या अधिक जवळ आणत आहे.

————————-

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments