Monday, November 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedमूट कोर्टची तयारी कशी करावी? रायसोनीच्या विधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन! - विद्यार्थ्यांना...

मूट कोर्टची तयारी कशी करावी? रायसोनीच्या विधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन! – विद्यार्थ्यांना न्यायालयीन युक्तिवाद आणि मूट कोर्ट स्पर्धेच्या तयारीचे धडे

 

पुणे : वकील होण्यासाठी केवळ कायद्याची पुस्तके वाचून चालत नाही, तर न्यायालयात आपली बाजू कशी मांडायची, प्रश्नांची उत्तरे कशी द्यायची आणि युक्तिवाद कसा करायचा, याचीही तयारी करावी लागते. याच उद्देशाने जी. एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ लॉच्या वतीने ३१ ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांसाठी मूट कोर्टच्या तयारीवर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी धाराशिव येथील बापूजी साळुंखे लॉ कॉलेजचे सहयोगी प्राध्यापक डॉ. संजय आंबेकर मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच फॅमिली कोर्ट बार असोसिएशनचे सचिव ॲड. राहुल जाधव यांची विशेष उपस्थिती होती.

यावेळी डॉ. आंबेकर यांनी मूट कोर्टमध्ये सहभागी होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी नेमकी कोणती तयारी करावी, केसचा अभ्यास कसा करावा, कायद्याच्या तरतुदी आणि न्यायालयीन निर्णयांचा आधार कसा घ्यावा, याबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. मूट कोर्टमध्ये न्यायाधीशांसमोर आपली बाजू आत्मविश्वासाने कशी मांडावी, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कशी द्यावीत, युक्तिवाद करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, याचीही माहिती त्यांनी दिली.

मूट कोर्टमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष न्यायालयात वकिलांची भूमिका कशी असते, याचा अनुभव मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मूट कोर्टकडे केवळ अभ्यासक्रमाचा भाग म्हणून न पाहता भविष्यातील वकिली व्यवसायाची तयारी म्हणून पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाचे आयोजन सुनील रायसोनी आणि श्रेयस रायसोनी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. डी. खराडकर आणि प्र-कुलगुरू डॉ. वैभव हेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. स्कूल ऑफ लॉच्या अधिष्ठाता डॉ. सारिका करंजुळे यांनी कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले.

यावेळी स्कूल ऑफ लॉच्या प्राध्यापिका प्रा. संगीता रावखंडे, प्रा. प्रदूमी पटेल आणि डॉ. हनुमंत दोडके उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयन डॉ. हनुमंत दोडके यांनी केले. बी.ए. एलएल.बी., बी.बी.ए. एलएल.बी., एलएल.बी. आणि एलएल.एम. अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

———————————-

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments