Monday, November 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedबीएनसीए'च्या डॉ. वैशाली लाटकर आंतरराष्ट्रीय वारसा मार्गदर्शनासाठी मलेशियात इंटरनॅशनल कौन्सिल ऑन...

बीएनसीए’च्या डॉ. वैशाली लाटकर आंतरराष्ट्रीय वारसा मार्गदर्शनासाठी मलेशियात इंटरनॅशनल कौन्सिल ऑन मॉन्यूमेंट्स अँड साईट्सच्या कार्यशाळेत सहभागी

 

 

पुणे, दि. ३ : महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेन मधील (बीएनसीए) संस्कृती अध्यायन केंद्राच्या प्रमूख आणि आंतरराष्ट्रीय वारसा प्रशिक्षणाच्या उपाध्यक्ष डॉ. वैशाली लाटकर या नुकत्याच मलेशियातील कुचिंग येथे भरवण्यात आलेल्या इंटरनॅशनल कौन्सिल ऑन मॉन्यूमेंट्स अँड साईट्सच्या (आयकोमॉस) २२व्या सर्वसाधारण सभेत, कार्यशाळेत आणि परिसंवादात सहभागी झाल्या. संपूर्ण जगभरात ऐतिहासिक वारसा स्थळांच्या जतन-संवर्धन विषयीचे संशोधनाबाबत डॉ. लाटकर व त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञ सहकार्यांनी मिळून एक शोधनिबंध सादर केला.

 

डॉ. लाटकर यांची सीआयएफ (आयकोमॉस इंटरनॅशनल ट्रेनिंग कमिटी) ह्या वारसा संरक्षण प्रशिक्षण संबंधित आंतरराष्ट्रीय समितीवर पश्चिम आणि दक्षिण आशियाच्या उपाध्यक्षा म्हणून फेरनिवड झाली. तसेच ह्या परिषदेमध्ये स्थानिक लोकसंस्थांच्या अधिकाऱ्यांसाठी असलेल्या प्रशिक्षण शिबिरात त्या प्रशिक्षक म्हणूनही त्या सहभागी झाल्या. याबद्दल बीएनसीएच्या प्रभारी प्राचार्य डॉ. शुभदा कमलापूरकर यांनी डॉ. लाटकर यांचे अभिनंदन केले.

 

या भेटीसंबधी माहिती सांगताना डॉ. लाटकर म्हणाल्या की, आशिया खंडातील हे आयोजन असून त्यामध्ये ऐतिहासिक वास्तू व स्मारके आणि सांस्कृतिक वारसा जतन करणाऱ्या जागतिक पातळीवर काम करणाऱ्या आयकोमॉस संस्थेची सर्वसाधारण सभा आशिया खंडात भरवण्यात आली. त्यामध्ये वैज्ञानिक परिसंवादात सहभागी होण्यासाठी जगभरातून पूरातत्त्वशास्त्रज्ञ, वारसा स्थळ संरक्षण तज्ज्ञ, वास्तूरचनाशास्त्र (आर्किटेक्चर) अभ्यासक आणि सुमारे १५०० संशोधक सहभागी झाले. त्यांनी सांस्कृतिक वारसा संवर्धन, शाश्वत विकास आणि जुन्या वास्तूंच्या रक्षणासंदर्भात विस्तृत चर्चा केली. या निमित्त विविध चर्चासत्रे आणि सहलींच्या आयोजनात विविध आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक समित्यांच्या बैठका, तज्ज्ञांची भाषणे यांच्या जोडीला स्थानिक ऐतिहासिक वारसा स्थळांच्या भेटी आणि जतन-संवर्धन कार्यशाळांचेही आयोजन केले.

 

ह्या संशोधन विषयातून निष्पन्न झालेल्या महत्वाचे मुद्दे जगभरातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाची दिशा ठरवण्यासाठी उपयुक्त ठरतील. त्यातून वेगवेगळ्या देशांमधील ऐतिहासिक वारसा शिक्षण तज्ज्ञांमध्ये समन्वय साधण्यासाठीही ते उपयोगी ठरतील. या निमित्त करण्यात येत असलेल्या संशोधनावर व परिषदेतील चर्चिल्या गेलेल्या विषयांवर दस्तावेज म्हणून पुस्तकही लवकरच प्रकाशित करण्यात येत असल्याचे डॉ लाटकर यांनी सां

गितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments