पुणे, दि. 4 (जिमाका,वृत्तसेवा) : दिवाळीनिमित्त पुणे जिल्ह्यात शुक्रवार, ६ नोव्हेंबर २०२६ रोजी धनत्रयोदशीऐवजी सोमवार, दि. ९ नोव्हेंबर २०२६ रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सारथी व वाहन प्रणालीवरील अनुज्ञप्ती आणि वाहन योग्यता प्रमाणपत्रासंबंधी कामकाजासाठी ९ नोव्हेंबर रोजी पूर्वनियोजित वेळ (अपॉइंटमेंट) घेतलेल्या अर्जदारांनी १२ ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत कोणत्याही कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी, कार्यालयीन वेळेत आयडीटीआर, आळंदी रोड किंवा दिवे येथील संबंधित कार्यालयात उपस्थित राहून आपले अर्ज सादर करावेत. या अर्जदारांची दि. ९ नोव्हेंबर रोजीची पूर्वनियोजित वेळ ग्राह्य धरली जाणार आहे.
तसेच, दि. ६ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या पक्क्या अनुज्ञप्तीसाठीची पूर्वनियोजित वेळ दि. ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता सारथी प्रणालीवर उपलब्ध होणार आहे. संबंधित अर्जदारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी केले आहे.


