Wednesday, November 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे शहरातील दोन ठिकाणची ऑटोरिक्षा मीटर तपासणी बंद; दोन ठिकाणी सुविधा सुरू...

पुणे शहरातील दोन ठिकाणची ऑटोरिक्षा मीटर तपासणी बंद; दोन ठिकाणी सुविधा सुरू राहणार*

 

 

पुणे, दि. 4 (जिमाका, वृत्तसेवा): प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणे यांच्या मान्यतेनुसार पिंपरी-चिंचवड व बारामती कार्यक्षेत्रातील ऑटोरिक्षांसाठी सुधारित भाडेदर १ सप्टेंबर २०२६ पासून लागू करण्यात आले आहेत. या अनुषंगाने ऑटोरिक्षा चालक व मालकांच्या सोयीसाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी मीटर तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

 

मात्र, अल्प प्रतिसादामुळे खराडी येथील ईऑन आयटी पार्कजवळ, खराडी पोलीस चौकीसमोर आणि शिवाजीनगर येथील सिंचननगर, रेंजहिल्स कॉर्नर या दोन ठिकाणची मीटर तपासणी बंद करण्यात येत आहे.

 

यापुढे मीटर तपासणीची सुविधा अलंकार पोलीस स्टेशनसमोर, कर्वेनगर तसेच रामटेकडी इंडस्ट्रियल इस्टेट, इगल्बर्ग कंपनी, लेन क्रमांक ३, रामटेकडी, पुणे येथे सोमवार ते शुक्रवार सकाळी ८ ते १० आणि शनिवारी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत या दोन ठिकाणी मीटर तपासणीचे कामकाज सुरू राहणार आहे.

 

सर्व ऑटोरिक्षा चालक व मालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. मीटर कॅलिब्रेशन पूर्ण झालेल्या ऑटोरिक्षा मीटर तपासणीसाठी उपरोक्त नमूद ठिकाणी सादर कराव्यात, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी केले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments