‘सहकार चळवळीच्या खच्चीकरणाचा’ व ‘गोकुळ च्या भ्रष्टाचारावर’ पांघरूण घालण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न..!!
पुणे दि – ४ नोव्हें २६
कोल्हापूर येथील “गोकुळ दुध उत्पादक संस्थेच्या”
प्रतिष्ठेच्या व चुरशीच्या निवडणुकीत माजी मंत्री, विधान परीषद काँग्रेस पक्षाचे नेते मा सतेजजी उर्फ बंटी साहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पँनेल बहुमताने निवडून आले, तेंव्हा पासून सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली होती. सभासदांच्या सतर्कतेमुळे व जागरूकतेने ९९.५० % मतदान झालेल्या निवडणूकीद्वारे निवडून आलेल्या संचालक मंडळावर’ महायुती सरकारचे अनैतिक व असंवैधानिक अतिक्रमण होत असून लोकशाही’चा गळा घोटण्याचे निंदनीय कृत्य असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस’चे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.
गुजराथ’च्या “अमूल”शी स्पर्धा करणाऱ्या कोल्हापूर च्या गोकुळ सह दुध उत्पादक संस्थेच्या संचालक मंडळात “४ शासकीय सदस्य” हे मतदानाच्या विशेष अधिकारासह(?) संचालक म्हणून नियुक्त करणे, हा निवडणूकी द्वारे यश न मिळाल्याने सरकारचा दडपशाहीचा निर्णय आहे.
संस्थेच्या सभासदांनी निवडून दिलेला कौल डावलून, सहकारी संस्थां मध्ये मनमानीपणे ‘सरकारी हस्तक्षेप’ करण्याचा प्रकार अस्वीकार्य व निंदनीय असून, ‘रडी चा डाव’ खेळणाऱ्या महायुती सरकारचा काँग्रेस पक्षातर्फे ‘तीव्र निषेध’ करत असल्याचे प्रदेश काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले.
————————————-


