Thursday, November 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedमाझ्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्त व गरजूंना मदत करणे ही माणुसकीची जपणूक आणि सामाजिक...

माझ्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्त व गरजूंना मदत करणे ही माणुसकीची जपणूक आणि सामाजिक जबाबदारी – मा. ना. मुरलीधर मोहोळ. क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे वैकुंठ विद्युतदाहिनीस विविध वस्तू भेट – संदीप खर्डेकर.

 

 

माझ्या वाढदिवसाला दुष्काळग्रस्त व गरजूंना मदत करणे ही माणुसकीची जपणूक आणि सामाजिक जबाबदारी असल्याचे मी मानतो आणि सर्वांनीच असे केल्यास माझ्यापर्यंत सर्वांच्या शुभेच्छा ही पोहोचतील आणि मला ही समाधान लाभेल असे ना. मुरलीधर मोहोळ म्हणाले.तसेच वैकुंठातील उणीवा दूर करण्यासाठी मी मनपा प्रशासनास योग्य सूचना देईन असेही मा. मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले.

क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने ना. मुरलीधर मोहोळ यांच्या ९ नोव्हेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून वैकुंठ विद्युतदाहिनीतील कर्मचारी व अंत्यविधी करणाऱ्या गुरुजींना आवश्यक साहित्य भेट देण्यात आले त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले.यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, विश्वस्त नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,वैकुंठातील गुरुजी अथर्व मोघे,प्रशांत मोघे, अजित मोघे, मयूर वैद्य,विद्युतदाहिनी चे सुपरवायझर गोरखनाथ कांबळे, कर्मचारी श्रीनिवास कोटा, क्रिएटिव्ह फाउंडेशन चे विश्वस्त प्रतीक खर्डेकर इ. उपस्थित होते.

वैकुंठ परिवाराशी माझं

३५ वर्षांचे नाते असून येथील गुरुजी व कर्मचाऱ्यांशी माझं भावनिक नातं आहे असे संदीप खर्डेकर म्हणाले. एक प्रकारे मी येथील सेवक वर्गाचा पालक असून त्यांच्या सुखदुःखात कायम सहभागी असतो,हे सर्वजण एक प्रकारे पुणेकरांची अशी सेवा करत आहेत ज्याचे पैश्यात किंवा वस्तुत मोल होणे शक्य नाही म्हणून यापुढे ही तेथे जे जे आवश्यक आहे ते देण्याचं वचन मी क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने देतो असेही खर्डेकर यांनी नमूद केले.

नामदार मुरलीधर मोहोळ हे सामाजिक कार्यातून पुढे आलेले नेतृत्व असून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे क्रिएटिव्ह फाउंडेशन ने ठरविले असून वैकुंठ येथे उपयुक्त साहित्याची भेट ही त्याचाच एक भाग असल्याचे फाउंडेशन च्या विश्वस्त नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.ना. मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ९ दिवस रक्तदान शिबीर, आरोग्य चिकित्सा शिबिरासह विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत असेही मंजुश्री खर्डेकर यांनी जाहीर केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments