Friday, November 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedकिल्ले रायरेश्वर परिसरातील आदिवासी-कातकरी वस्त्यांमध्ये दिवाळीचा आनंद; फराळ, आकाशकंदील व सायकलींचे वाटप*

किल्ले रायरेश्वर परिसरातील आदिवासी-कातकरी वस्त्यांमध्ये दिवाळीचा आनंद; फराळ, आकाशकंदील व सायकलींचे वाटप*

 

 

पुणे : दिवाळीचा आनंद समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने भोर तालुक्यातील अतिदुर्गम अशा किल्ले रायरेश्वर परिसरातील टिटेघर, नाझरे व माकोशी येथील आदिवासी-कातकरी वस्त्यांमध्ये पुणे शहरातील गणेशोत्सव मंडळांच्या वतीने दिवाळी साजरी करण्यात आली.

 

या उपक्रमांतर्गत ५१ आदिवासी कुटुंबांना दिवाळी फराळ व आकाशकंदील भेट देण्यात आले. तसेच शैक्षणिक मदतीचा भाग म्हणून लहान विद्यार्थ्यांसाठी पाच सायकलींचे वाटप करण्यात आले. दिवाळी फराळ व सायकलींची भेट मिळाल्याने वस्तीवरील लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता.

 

हा सामाजिक उपक्रम जय गणेश व्यासपीठ, पुणे शहर यांच्या अंतर्गत नवज्योत मित्र मंडळ, येरवडा; वीर शिवराज मंडळ, गुरुवार पेठ; संजीवनी मित्र मंडळ, सहकारनगर आणि साईनाथ मंडळ ट्रस्ट, बुधवार पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

 

दुर्गम भागातील कातकरी विद्यार्थ्यांपर्यंत सायकली पोहोचविण्यासाठी सागर गांधी व पीयूष शहा यांनी विशेष योगदान दिले.

 

कार्यक्रमाचे आयोजन अमित जाधव, किरण सोनीवाल, प्रसाद दिवटे, निलेश कोंढांपूरे, चैतन्य सिन्नरकर व अक्षय पानसरे यांनी केले होते.

 

दिवाळीचा सण केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता समाजातील गरजू घटकांसोबत आनंद वाटून साजरा करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

नाझरे वस्ती वरील महिला अध्यक्षा मंगला वाघमारे यांनी पुण्यातील गणेशोत्सव कार्यकर्त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत आभार मानले

आज तुमच्या मुळे आमची दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments