Saturday, November 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्री रामानुजाचार्य समता पुरस्काराने पुण्यातील एअर मार्शल डॉ प्रदीप बापट,लेफ्टनंट जनरल राजेंद्र...

श्री रामानुजाचार्य समता पुरस्काराने पुण्यातील एअर मार्शल डॉ प्रदीप बापट,लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर,लेफ्टनंट जनरल डॉ शौकिन चौहान सन्मानित.

 

 

— देशभरातून ७० माजी सैन्याधिकारी व संरक्षण वैज्ञानिक यांचा हैदराबाद येथे सैनिकांच्या सन्मानार्थ एका भव्य कार्यक्रमात सन्मान.

 

पुणे

(प्रतिनिधी)

हैदराबाद येथील एच एच त्रिदंडी श्रीमन्ननारायणा रामानुजा चिन्ना जियार स्वामीजी यांच्यातर्फे भारतीय सैनिकांचे शौर्य,त्याग आणि देशसेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याठी देशभरातून ७० माजी सैन्याधिकारी व संरक्षण वैज्ञानिक यांना समता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पुण्यातील एअर मार्शल डॉ प्रदीप बापट ( निवृत्त ),लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर (निवृत्त)लेफ्टनंट जनरल डॉ शौकिन चौहान (निवृत्त)यांना हैदराबाद येथील “स्टॅचू ऑफ इक्विलिटी “statue of equality” च्या परिसरात भारतमातेच्या सेवेबद्दल “रामानुजाचार्य समता पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी यांची मुख्य उपस्थिती होती.

सर्व सत्कारार्थी

सैन्याधिकाऱ्यांचा सन्मानपत्र,शाल,पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन त्यांना गौरविण्यात आले.

एअर मार्शल डॉ प्रदीप बापट(निवृत्त) यांना राष्ट्रपती यांच्या हस्ते परम विशिष्ट सेवा मेडल पुरस्काराने,तसेच मध्य प्रदेश सरकारच्या “रत्न अलंकार” पुरस्काराने सन्मानित केले आहे.विजय गाडगीळ मेमोरियल “उत्तुंग जीवन साफल्य पुरस्कार” देखील त्यांना प्राप्त झाला आहे.एअर मार्शल डॉ प्रदीप बापट हे सध्या अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेचे महाराष्ट्र व गोवा राज्याचे अध्यक्ष आहेत.तसेच “मेस्को”च्या संचालक मंडळावर पण आहेत.मणिपूर विद्यापीठाची नुकतीच त्यांना मानद डॉक्टरेट प्राप्त झाली आहे.

कार्यक्रमास संपूर्ण भारतातून संरक्षण क्षेत्रातील अधिकारी,समाजातील विविध मान्यवर उपस्थित होते.

——-

सोबत – प्रमाणपत्र,

फोटो

१) एअर मार्शल डॉ प्रदीप बापट

२) लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर

३) लेफ्टनंट जनरल डॉ शौकिन चौहान

——-

अधिक माहितीसाठी

एअर मार्शल डॉ प्रदीप बापट

7042533940

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments