नांदेड, 16 नोव्हेंबर 2026: नांदेड डिस्ट्रिक्ट आणि सिटी शहर लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित आयटीएफ, एआयटीए, एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या कोहिनुर-एनईएस एमटी 200 जागतिक वर्ल्ड मास्टर्स वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत गणेश देवखिळे, संजय चंदवानी, गौरबदीप घोष, स्वरणदीप सिंग धोडी यांनी आपापल्या गटातील प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
एनईएस सायन्स कॉलेज येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 40 वर्षांवरील पुरुष गटात अंतिम फेरीत बिगर मानांकित गणेश देवखिळेने दुसऱ्या मानांकित जय नारायण के.आर.चा 2-6, 6-3, 10-4 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. 50वर्षांवरील पुरुष गटात अंतिम फेरीत संजय चंदवानीने अव्वल मानांकित जितेंद्र गंभीरचा 6-2, 6-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
35 वर्षांवरील पुरुष गटात अंतिम लढतीत अव्वल मानांकित गौरबदीप घोषने शशांक बोमनाळेचा 6-1, 6-0 असा सहज पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.
45वर्षांवरील पुरुष गटात अंतिम सामन्यात अव्वल मानांकित स्वरणदीप सिंग धोडीने पराग अत्रेवर 7-5, 6-1 असा विजय मिळवत विजेतेपद पटकावले.
55वर्षांवरील पुरुष: उपांत्यपूर्व फेरी:
केतन बेडेकर (भारत) वि.वि.जितेंद्र जोशी (भारत)6-0, 6-1;
एलामुरुगु अय्यासामी [1](भारत) वि.वि.सुनील मिश्रा (भारत)6-2, 6-3;
अशोक इंगळे(भारत)वि.वि.धरमवीर सिंग[2](भारत)6-1, 6-3;
60वर्षांवरील पुरुष: उपांत्यपूर्व फेरी:
आलोक रैना (भारत)वि.वि.एकनाथराव घोडेकर (भारत)6-1, 6-1;
संजय कुमार[1](भारत)वि.वि.विजय कामत (भारत)6-3, 6-3;
70वर्षांवरील पुरुष: उपांत्यपूर्व फेरी:
शिव मोर (भारत)वि.वि.शिवाजी चव्हाण (भारत)6-1, 7-5;
शाम गायकवाड (भारत)वि.वि.नरहरी कडेकऱ (भा
रत)6-1, 6-1


