Wednesday, November 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedकर्तव्य बजावताना अपंगत्व आलेल्या जवानांसोबत भाऊबीज साजरी*

कर्तव्य बजावताना अपंगत्व आलेल्या जवानांसोबत भाऊबीज साजरी*

 

 

खडकी येथील अपंग सैनिक पुनर्वसन केंद्रात सैनिकांसोबत भाऊबीज : सैनिक मित्र परिवार आणि सहयोगी संस्थांच्या वतीने आयोजन

 

पुणे : देशसेवा बजावताना गंभीर दुखापतीमुळे अपंगत्व आलेल्या जवानांना दिवाळीच्या सणात कुटुंबाची उणीव भासू नये, या भावनेतून खडकी येथील अपंग सैनिक पुनर्वसन केंद्रात (पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटर) भाऊबीज साजरी करण्यात आली. भारत माता की जय… च्या घोषणांनी यावेळी परिसर दुमदुमून गेला.

 

सैनिक मित्र परिवार आणि सहयोगी संस्थांच्या वतीने आयोजित या सोहळ्याला ज्येष्ठ नृत्यांगना सुरेखा पुणेकर, लेखिका सुनेत्रा मंकणी आणि राष्ट्रीय खेळाडू शकुंतला खटावकर, केंद्राचे कर्नल आर. के. मुखर्जी, कर्नल बी.एल. भार्गव आदी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते जवानांचे औक्षण करण्यात आले. कपाळावर टिळा लावून आणि दिवाळीचा फराळ देऊन जवानांप्रती स्नेह व्यक्त करण्यात आला.

 

सिमरन गुजराथी, तृप्ती पाटील, ललिता जळगावकर, कल्याणी सराफ, श्रेया फाटक, आरती नाईक, सुप्रिया तांबट आदिंनी कार्यक्रमाच्या संयोजनात सहभाग घेतला. देशसेवेसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या जवानांच्या पाठीशी संपूर्ण समाज उभा असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

 

औक्षणानंतर जवानांच्या मनोरंजनासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गायन, संगीत आणि संवादाच्या माध्यमातून कार्यक्रमात रंगत आली. जवानांनीही या कार्यक्रमात आनंदाने सहभाग घेतला.

 

आयोजक आनंद सराफ म्हणाले, देशासाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या जवानांसोबत दिवाळीचा आनंद वाटून घेणे आणि जवानांना कुटुंबाची उणीव जाणवू नये आणि त्यांच्याप्रती समाजातील आदर व्यक्त व्हावा, या उद्देशाने दरवर्षी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments