Wednesday, November 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोहिनुर-एनईएस एमटी 200 जागतिक वर्ल्ड मास्टर्स वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत संजय कुमारला...

कोहिनुर-एनईएस एमटी 200 जागतिक वर्ल्ड मास्टर्स वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत संजय कुमारला दुहेरी मुकुट

नांदेड, 18 नोव्हेंबर 2026: नांदेड डिस्ट्रिक्ट आणि सिटी शहर लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित आयटीएफ, एआयटीए, एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या कोहिनुर-एनईएस एमटी 200 जागतिक वर्ल्ड मास्टर्स वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत 60 वर्षांवरील पुरुष गटात संजय कुमार याने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.

 

एनईएस सायन्स कॉलेज येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत 55वर्षांवरील पुरुष गटात केतन बेडेकरने अशोक इंगळेचा 6-3, 6-4 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

60 वर्षांवरील पुरुष गटात अंतिम लढतीत अव्वल मानांकित संजय कुमारने दुसऱ्या मानांकित एस. एन. वशिष्ठचा 6-3, 6-1 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला.

 

70वर्षावरील पुरुष गटात शिव मोर याने शाम गायकवाडचा 1-6, 6-4, 10-5 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. 80 वर्षांवरील पुरुष गटात अंतिम सामन्यात दुसऱ्या मानांकित जनार्दन कांबळेने कमलनयन शिरोळकरचा 3-6, 6-3, 10-6 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

 

दुहेरीत 60वर्षांवरील पुरुष गटात संजय कुमार व एस. एन. वशिष्ठ यांनी रवींद्र नगरकर व आलोक रैना यांचा 6-0, 6-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धा संचालक डीएस रामा राव, एमएसएलटीए कार्यकारी समितीचे सदस्य अली मोहम्मद पंजवानी, आयटीएफ सुपरवायझर वैशाली शेकटकर यांच्या हस्ते करण्यात आले.

 

निकाल: अंतिम फेरी:

55वर्षांवरील पुरुष गट: केतन बेडेकर (भारत)वि.वि.अशोक इंगळे (भारत) 6-3, 6-4

60 वर्षांवरील पुरुष गट: संजय कुमार (भारत) [1]वि.वि.एस. एन. वशिष्ठ (भारत) [2] 6-3, 6-1;

70वर्षावरील पुरुष गट: शिव मोर (भारत) वि.वि.शाम गायकवाड (भारत)1-6, 6-4, 10-5;

80 वर्षांवरील पुरुष गट: जनार्दन कांबळे(भारत)[2]वि.वि.कमलनयन शिरोळकर (भारत)3-6, 6-3, 10-6;

 

दुहेरी: अंतिम फेरी

60वर्षांवरील पुरुष: संजय कुमार (भारत) /एस. एन. वशिष्ठ (भारत) वि.वि.रवींद्र नगरकर/आलोक रैना(भारत)6-0, 6

-1.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments