Thursday, November 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedउरुळी कांचन ग्रामपंचायतीत विधी सेवा शिबिर उत्साहात* *नागरिकांच्या कायदेशीर मदतीसाठी एमआयटी...

उरुळी कांचन ग्रामपंचायतीत विधी सेवा शिबिर उत्साहात* *नागरिकांच्या कायदेशीर मदतीसाठी एमआयटी एडीटी ‘स्कूल ऑफ लॉ’च्या विद्यार्थ्यांतर्फे आयोजन*

 

*उरुळी कांचन (पुणे) :* सर्वसामान्य नागरिकांना कायदेशीर हक्क, अधिकार आणि उपलब्ध न्यायव्यवस्थेची माहिती सहजपणे मिळावी, या उद्देशाने एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लॉ, उरुळी कांचन ग्रामपंचायत आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (DLSA) यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालयात विधी सेवा (लीगल एड) शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना विविध कायदेशीर तरतुदी, त्यांचे मूलभूत हक्क, न्याय मिळविण्याच्या प्रक्रिया आणि विधी सेवा प्राधिकरणामार्फत उपलब्ध असलेल्या कायदेशीर सहाय्याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामस्थांनी आपले वैयक्तिक तसेच स्थानिक पातळीवरील कायदेशीर प्रश्न मांडले. त्यावर उपस्थित वकिलांनी प्रश्नांचे स्वरूप समजून घेत कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन केले. त्यामुळे नागरिकांना आपल्या कायदेशीर समस्यांबाबत योग्य दिशा मिळण्यास मदत झाली.

या कार्यक्रमाला उरुळी कांचनचे सरपंच मिलिंद टी. जगताप, जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष आबासाहेब कांचन पाटील, ग्रामविकास अधिकारी पाटील, मोजणी अधिकारी सतिश कुदळे, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्हीजेएनटी सेलचे अध्यक्ष दिलीप गाडेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र टिळेकर, स्कुल ऑफ लाॅ चे प्रभारी अधिष्ठाता डाॅ.गोविंद राजपाल, प्रा.आदित्य केदारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लॉमधील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.

एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष व प्र.कुलपती प्रा.डॉ. मंगेश कराड यांच्या प्रेरणेने, तसेच सरपंच मिलिंद जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत कायदेशीर मार्गदर्शन पोहोचविण्याच्या दृष्टीने अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल ग्रामस्थांनी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड आणि सरपंच मिलिंद जगताप यांचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments