मनाला भिडणाऱ्या भावना, आपल्याशा वाटणाऱ्या व्यक्तिरेखा आणि अनपेक्षित वळणांमुळे काही कथा मनावर कायमची छाप सोडतात. प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या झी टीव्हीवरील ‘वसुधा’ मालिकेनेही रंजक कथानक आणि नातेसंबंधांच्या प्रभावी चित्रणातून प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. प्रत्येक नवीन घडामोडीतून कथेला नवेपण देणारी ही मालिका प्रेक्षकांच्या मनाला भावली आहे. त्यामुळे त्यांच्या लाडक्या व्यक्तिरेखांचा प्रवास अधिकच खास ठरला असून ‘वसुधा’ने भारतीय दूरचित्रवाणीवरील आघाडीच्या मालिकांमध्ये स्थान मिळवले आहे!
अनेक आव्हानांवर मात केल्यानंतर वसुधा आणि देवांश यांनी अखेर एकत्रित आयुष्याच्या नवीन अध्यायाला सुरुवात केली आहे. चंद्रिकाने वसुधाचा सून म्हणून स्वीकार करत त्यांच्या नात्याला आशीर्वाद दिले आहेत. बहुप्रतीक्षित लग्नसोहळा आणि त्यानंतरच्या विधींसह हे दोघे सहजीवनाच्या या नव्या पर्वाचा आनंद घेत आहेत. मात्र हे नवविवाहित जोडपे संसारात रुळू लागले असतानाच त्यांच्यासाठी एक खास आश्चर्य वाट पाहत आहे! या उत्साहात आणखी भर घालण्यासाठी अभिनेते आयुषमान खुराणा आणि अभिनेत्री शर्वरी वाघ ‘वसुधा’मध्ये खास हजेरी लावणार आहेत. त्यांच्या आगमनाने कथानकाला एक अनपेक्षित आणि रोमांचक वळण मिळणार असून वसुधा आणि देवांशच्या आयुष्यात पुढे काय घडणार याबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढणार आहे.
आयुषमान आणि शर्वरी यांनी सेटवर सर्व कलाकारांसोबत धमाल केली. मालिकेतील प्रमुख कलाकारही त्यांच्यासोबतच्या चित्रीकरणाच्या अनुभवाबद्दल भरभरून बोलत होते. आयुषमान खुराणा आणि शर्वरी वाघ हे ‘वसुधा’चा भाग बनल्याचा आनंद व्यक्त करताना मालिकेत अनुक्रमे वसुधा आणि देवांशच्या भूमिका साकारणारे प्रिया ठाकूर आणि अभिषेक शर्मा म्हणाले, “आयुषमान आणि शर्वरीसोबत चित्रीकरण करताना आम्हांला खूप मजा आली! हा प्रसंग खूप छान जमून आला आहे आणि प्रेक्षक तो कधी पाहतील याची आम्हांला उत्सुकता लागली आहे. वसुधा आणि देवांशच्या प्रवासातील इतक्या खास क्षणाचा ते भाग बनले याचा विशेष आनंद आहे. हे प्रेक्षकांसाठी एक सुंदर सरप्राईज असणार आहे आणि पुढे जे घडणार आहे ते त्यांना नक्कीच आवडेल याची आम्हांला खात्री आहे. लवकरच काहीतरी धमाल घडणार आहे,तेव्हा पाहत रहा!”
वसुधा आणि देवांशच्या सहजीवनाची नवी सुरुवात, खास पाहुण्यांचे आगमन आणि लवकरच उलगडणाऱ्या रोमांचक घडामोडी यांमुळे ‘वसुधा’मध्ये आणखी एक संस्मरणीय वळण पाहायला मिळणार असून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होणार आहे. या खास पाहुण्यांच्या हजेरीने नवविवाहित जोडप्याच्या आयुष्यात काय घडेल आणि त्यांच्यासाठी कोणते आश्चर्य दडले आहे हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा ‘वसुधा’!


