भारत, १९ नोव्हेंबर २०२६ – देशात शीतपेय रेफ्रिजरेशन उद्योगातील वाढती गरज लक्षात घेत, गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या अप्लायन्सेस विभागाने गोदरेज ‘इन्टाकूल’ हे अनोखे उपकरण बाजारात आणले आहे. पेये झटपट थंड करुन देणारे हे देशातील पहिलेच उपकरण आहे. पेय थंड करून देण्याच्या प्रक्रियेत वेग मिळावा याकरिता पहिल्यांदाच अशा पद्धतीचे तंत्रज्ञान वापरले गेले आहे. यामुळे शीतकरण आणि आदरतिथ्य क्षेत्राच्या कामकाजांना गती मिळाली आहे. तसेच, या क्षेत्रातील कार्यक्षमता वाढली आहे. हे आधुनिक उपकरण अवघ्या एक ते चार मिनिटांत कोणतेही पेय थंड करते. त्यामुळे पेये आधीच थंड करुन ठेवण्याची मेहनत वाचते. शीतपेयांमध्ये ग्राहकांना आता असंख्य पर्याय उपलब्ध होतील. कमी वेळात त्यांना आपल्या आवडीचे पेय निवडता येईल. पेये विकणा-या व्यावसायिकांच्या वीजेच्या खर्चात घट होईल. दुकानातील जागाही अडकून राहणार नाही. ग्राहकांना शीतपेयांमध्ये असंख्य पर्याय उपलब्ध होत असल्याने व्यवसाय तेजीत होईल. उत्पादक कंपन्यांनाही आर्थिक फायदा होईल. विजेची बचत होईल. परिणामी, वीज ग्रीडवरील ताण कमी होईल. हे स्वदेशी उत्पादन असल्याने परदेशी आयातीवरील अवलंबित्व कमी होईल, असा विश्वास कंपनीच्यावतीने व्यक्त करण्यात आला.
सद्यस्थितीत देशातील शीतकरण पेय उद्योगात अंदाजे १.२ ते १.५ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी उलाढाल होते. संघटित रिटेल, अन्न सेवा आणि हॉस्पिटेलिटी क्षेत्राचा झपाट्याने विस्तारत आहे. त्यामुळे पुढील दहा वर्षांत या उद्योगात ९ ते ११ टक्के सीएजीआर दराने वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वाढते उत्पन्न, वाढता तरुणवर्ग, शहरीकरण यामुळे वाईन व क्राफ्ट बिअर यांसारख्या पेयांची मागणी वाढत आहे. विविध सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून, २०२४ ते २०२९ या काळात कॅफे आणि बार क्षेत्रात ८ टक्क्यांहून अधिक सीएजीआर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशात ६५ हजारांहून अधिक बार आणि क्लब्स सक्रिय असून, भविष्यात वाढत्या मागण्यांचा विचार करता ही संख्या उत्तरोत्तर वाढत राहील. बार आणि क्लब्समध्ये शीतकरण उपकरणांचा वापर सतत सुरु असतो. पारंपरिक उपकरणे मोठी जागा व्यापतात शिवाय खर्चासही आमंत्रण देतात. महागड्या उपकरणांच्या परदेशी आयातीमुळे त्यांचा खर्चही जास्त असतो. आताअनेक व्यावसायिक या उद्योगातील कार्यक्षमता वाढवण्याकडे भर देत आहे. वीजेचा कमी वापर करत, जागेचा अपव्यय टाळण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. यातूनच तंत्रज्ञानावर आधारित नाविन्यपूर्ण पेय शीतकरण उपायांची गरज निर्माण झाली आहे. नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ही गरज पूर्ण करता यावी, हे गोदरेजचे उद्दिष्ट आहे.
इन्स्टाकूल उत्पादनाच्या निर्मितीसाठी गोदरेजने यूकेमधील ‘व्ही-टेक्स’ कंपनीशी सामंज्य करार केला होता. या उपकरणात ‘व्ही-टेक्स’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ‘व्ही टेक्स’ तंत्रज्ञानाला पेटंटच्या माध्यमातून शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. गरजेनुसार पेय थंड करण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरत असून, द्रव पेय ठेवण्यासाठी वापरली जाणारी कॅन तसेच बाटल्यात थंड पेय उपलब्ध करुन दिले जाते. पारंपरिक शीत उपकरणांच्या तुलनेत, या आधुनिक उपकरणाच्या वापराने ७० टक्क्यांहून जास्त विजेची बचत होते. या उपकरणाचा आकार एका डिशवॉशरइतका लहान आहे. त्यामुळे नेहमीच्या व्यावसायिक शीतकरण उपकरणांच्या तुलेनत हे खूपच सुटसुटीत आहे. पेये सतत थंड ठेवण्यासाठी आवश्यक यंत्रणेत घट होते. जागेची व्याप्ती वाचते. पेय उत्पादक, वितरक, किरकोळ विक्रेते आणि आदरतिथ्य क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी हे उपयुक्त ठरले आहे. भारतात तयार झालेले हे उत्पादन संपूर्ण उद्योगासाठी क्रांतिकारी ठरले आहे.
‘इन्स्टाकूल’ या उपकरणाचा अनावरण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या अप्लायन्सेस व्यवसायाचे बिझनेस प्रमुख कमल नंदी यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “देशात अन्नसेवा, हॉस्पिटेलिटी, संघटित रिटेल क्षेत्र यांत बदत होत आहे. हे क्षेत्र व्यावसायिक शीतकरण उपायांसाठी नवे मार्ग खुले करत आहे. आज हॉटेल व आदरतिथ्य क्षेत्रातील व्यवसाय कामाची कार्यक्षमता वाढवण्यावर लक्ष देत आहेत. वीज बचत आणि जागेचा योग्य वापर यांनाही प्राधान्य दिले जात आहे.
गोदरेज इन्टाकूलच्या माध्यमातून आम्ही व्यावसायिक शीतकरण क्षेत्रात पाऊल टाकत आहोत. आम्ही वेगवेगळ्या तंत्रज्ञानासह शीतकरण क्षेत्रातील निर्मिती तसेच सेवा कौशल्यांची सांगड घालत आहोत. हे स्वदेशी उपकरण अवघ्या एक ते चार मिनिटांत पेय थंड करते. ७० टक्क्यांहून जास्त विजेची बचत करते. त्यामुळे थंड पेय विक्रेत्यांच्या दैनंदिन कामकाजातील अडचणी दूर होतात. त्यांचा खर्च कमी होतो. उत्पन्नात वाढ होते. पेय उत्पादक कंपन्यांची विक्री होते. ग्राहकांना चांगला अनुभव मिळतो. व्यावसायिक शीतकरण उपकरणांमुळे वीज ग्रीडवर येणारा ताण कमी होतो. देशात प्रीमियम व्यावसायिक पेय शीतकरण क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी इन्स्टाकूलसारख्या तंत्रज्ञानावर आधारित उपायांमध्ये मोठी क्षमता आहे.”
आजकाल उद्योग-व्यवसायात कार्यक्षम उपाययोजनांसह बदलत्या गरजा पूर्ण करणारे पर्याय स्विकारले जातात. इन्स्टाकूलच्या माध्यमातून आम्ही व्यावसायिक पेय शीतकरणाची प्रक्रिया सोपी करत आहोत. आम्ही अनेक शीतकरण यंत्रांऐवजी प्रभावी उपकरण देत आहोत. हे उपकरण पेय थंड करण्याच्या कार्यक्षमतेत वेगवाग ठरत आहे. या उपकरणामुळे वीज आणि जागेचीही बचत होते. गरजेनुसार थंड पेय उपलब्ध करता येत असल्याने हॉटेल आणि आदरतिथ्य क्षेत्रातील व्यवसायांना ग्राहकांसाठी पेयांचे अनेक पर्याय निवडता येतात. यामुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात विविध पेयांची निवड करता येते. शीतपेयांचा आस्वाद घेण्याचा त्यांचा अनुभव चांगला ठरतो, अशी माहिती गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप अप्लायन्से व्यवसायाच्या इन्स्टाकूल प्रॉडक्ट्सचे प्रमुख जयशंकर नटराजन यांनी सांगितले.
रेस्टॉरंट्स, बार, पेयांची दुकाने आणि विविध कार्यक्रमांत वापरण्यासाठी इस्टाकूल उपकरणाची निर्मिती करण्यात आली आहे. या उपकरणाच्या मदतीने विविध प्रकारची पेय अल्पावधीत थंड केली जातात. या उपकरणात १५० मिली ते १५०० मिलीपर्यंतचे कॅन, काचेच्या बाटल्या आणि पीईटी बाटल्या सहज मावतात. तसेच, ३७० मिमी उंची आणि १०० मिमी व्यास असलेल्या बहुतांश वाईनच्या बाटल्याही ठेवता येतात. लहान व सुटसुटीत रचनेमुळे कमी जागेत हे सहज मावते. दुकानात मोकळी जागा उपलब्ध होते. या उपकरणाच्या कार्यक्षम कामामुळे वीजेचा वापरही कमी होतो. हे उत्पादन मागणीनुसार विशेष किमतीत उपलब्ध करुन दिले जाईल, असे गोदरेजच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.


