Sunday, November 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedरक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमी तरुणांनी जास्तीतजास्त रक्तदान करावे - ना. मुरलीधर मोहोळ यांचे...

रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमी तरुणांनी जास्तीतजास्त रक्तदान करावे – ना. मुरलीधर मोहोळ यांचे आवाहन. तातडीची गरज म्हणून आयोजित शिबिरात ६० बाटल्या रक्त संकलन – प्रतीक खर्डेकर.

 

 

सध्या पुण्यात मोठ्या प्रमाणावर रक्त तुटवडा जाणवत असून ह्या तुटवड्याच्या पार्श्वभूमी तरुणांनी जास्तीतजास्त रक्तदान करावे व रुग्णांना आधार द्यावा असे आवाहन ना. मुरलीधर मोहोळ यांनी केले.

ना. मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रतीक खर्डेकर आणि सौ. कल्याणी खर्डेकर यांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिराचे नियोजन केले होते, मात्र रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमी तातडीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ६०

बाटल्या रक्त संकलन करण्यात आल्या. यावेळी ना. मुरलीधर मोहोळ यांनी शिबिराला भेट देताना वरील आवाहन केले. आपण योग्य पद्धतीने रक्त संकलनाचे आवाहन केले आणि तरुणांना त्याचे महत्त्व पटवून दिले तर मोठ्या प्रमाणावर रक्त संकलन होऊ शकते व रक्ताचा तुटवडा जाणवणार नाही असे ही मत ना. मोहोळ यांनी व्यक्त केले. यावेळी वारजे कर्वेनगर प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, भाजपा शहर सरचिटणीस नगरसेवक पुनीत जोशी, सरचिटणीस दीपक पोटे, शहर उपाध्यक्ष नगरसेवक सुनील पांडे, नगरसेविका ऍड.मिताली सावळेकर, मंडल अध्यक्ष गिरीश खत्री,कुलदीप सावळेकर,प्रशांत हरसूले,गायत्री लांडे, अनघा जगताप, ऍड. प्राची बगाटे,हेमंत भावे,संगीता आधवडे,संगीता शेवडे,शंतनू खिलारे,हेमंत बोरकर,रुक्मिणी ताम्हाणे,मंगल शिंदे,निलेश घोडके,योगेश निंबरे,संतोष लांडे,वैभव जमदाडे,समीर ताडे,सुमित दिकोंडा,पूनम कारखानीस, स्वाती मानकर,अखिल भारतीय ब्राह्मण संघाचे मंदार रेडे, महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे मयुरेश अरगडे, मकरंद मानकीकर,पतीत पावन संघटनेचे श्रीकांत शिळमकर, मनोज नायर, गोकुळ शेलार इ मान्यवर उपस्थित होते.

तरुणांना रक्तदानास प्रवृत्त करण्यासाठी मोहीम आखत असल्याचे प्रतीक खर्डेकर, कल्याणी खर्डेकर यांनी जाहीर केले. जनसेवा ब्लड सेंटर च्या सहकार्याने शिबीर आयोजित करण्यात आले यावेळी जनसेवा ब्लड सेंटर चे संचालक लक्ष्मण बिरादार, रमेश बिरादार,अनिता हिरेमठ, अनिकेत मुगळे ,रोहन सावदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments