*पुणे दिनांक 22 नोव्हेंबर 2026*: यजमान भारतीय खेळाडूंनी सात सुवर्ण, आठ रौप्य व 14 कास्य अशी २९ पदके जिंकून इंडिया तायक्वांदो आयोजित पहिल्या इंडिया इंटरनॅशनल तायक्वांदो स्पर्धेचा पहिला दिवस गाजविला. महिलांच्या ६७ किलो वजनी गटात ऑस्ट्रेलियाच्या रोझी एबीला लोदिजिना हिने सुवर्णपदक जिंकले
शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॉक्सिंग सभागृहात आयोजित केलेल्या या स्पर्धेतील पुरुष गटात अभिजीत खोपडे (५४किलो),अब्दुल वाहिद (६३ किलो), शिवम शेट्टी (७४ किलो),शिवांश त्यागी (८७किलो)यांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली तर महिला गटात झिना राजा (४९ किलो),अस्मी भारती (५७ किलो) ज्योती यादव (७३ किलो) यांनी सुवर्णपदक जिंकले.
महिलांच्या ६७ किलो वजनी गटात ऑस्ट्रेलियाच्या रोझी एबीला लोदिजिना हिने भारताच्या सानिया खान हिला पराभूत करून सुवर्णपदक जिंकले. या गटात श्रीलंकेच्या पामुदिनी वेलीफितीयागे व हाशिनिका आलुपोथा यांनी कांस्य पदक पटकाविले. या गटाचा अपवाद वगळता अन्य सर्व गटांमध्ये भारतीय खेळाडूंचेच प्राबल्य होते.
गटवार निकाल याप्रमाणे :
पुरुष- ५४ किलो- १. अभिजीत खोपडे,२. हरमानसिंग,३. दर्शन परकी व भूपेंदर. (सर्व भारत). ६३ किलो -१. अब्दुल वाहिद,२. जे. शौर्य,३.हर्षकुमार व राजवर्धन वेळेकर (सर्व भारत). ७४ किलो -१. शिवम शेट्टी, २. आकाश मेंढीकोंडा,३. अमिम मोहम्मद व रियान सैकिया. (सर्व भारत).८७ किलो -१. शिवांश त्यागी,२. प्रसाद पाटील,३.अजय सुधाकर व नरेश सिंग. (सर्व भारत).
महिला -४९ किलो १. झिना राजा,२. मुस्कान मनयु,३. आर लालबियानुमी व झोया खान. (सर्व भारत).५७ किलो -१.अस्मी भारती,२. ईश्वरी सोनवणे, एबिना कुणाथ व श्वेता शेवाळे.(सर्व भारत). ६७ किलो – १.रोझी एबीला लोदिजिना (ऑस्ट्रेलिया), २. सानिया खान (भारत),३. पामुदिनी वेलीफितीयागे व हाशिनिका आलुपोथा). ७३ किलो -१.ज्योती यादव,२. सौम्या सिन्हा,३. पूजा कुमारी व हिमांशू अंतिल
(सर्व भारत).


