पुणे, महाराष्ट्र, २३ नोव्हेंबर २०२६: अग्रगण्य प्रीमियम टायर उत्पादक कंपनी ‘कॉन्टिनेंटल’ ने पुण्यामध्ये नवीन ‘कॉन्टिनेंटल प्रीमियम ड्राईव्ह’ (सीपीडी ) डीलरशिपचे उद्घाटन केले आहे. दर्शन टायर द्वारे संचलित हे नवीन आऊटलेट दुकान क्र. ३, सृष्टी कॉम्प्लेक्स, पुणे-नगर रोड, रामवाडी मेट्रो स्टेशनजवळ, संकल्प नगरी, रामवाडी, वडगाव शेरी, पुणे, महाराष्ट्र ४११०१४ येथे स्थित आहे. ही डीलरशिप पश्चिम भारतातील कॉन्टिनेंटलची रिटेल उपस्थिती अधिक मजबूत करते, ज्यामुळे या भागातील ग्राहकांना त्यांची प्रीमियम टायर श्रेणी आणि व्यावसायिक वाहन देखभाल आणि टायर सेवा अधिक जवळ उपलब्ध होतील.
४,५०० चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेले, पुणे येथील सीपीडी आउटलेट हे कार्यक्षम आणि विश्वासार्ह सेवा देण्यासाठी तयार केलेले आधुनिक, अत्याधुनिक सुविधा केंद्र आहे. ग्राहक कॉन्टिनेंटलची प्रीमियम टायर श्रेणी तसेच टायर बदलणे, बॅलन्सिंग, व्हील अलाइनमेंट, नायट्रोजन इन्फ्लेशन, अलॉय व्हील्स आणि वाहनांचे प्रोफेशनल डिटेलिंग यांसारख्या ऑन-साइट सेवांचा सर्वसमावेशक संच मिळवू शकतात. प्रीमियम उत्पादने आणि आवश्यक विक्रीनंतरच्या सेवा एकाच छताखाली एकत्र आणून, नवीन डीलरशिपचा उद्देश ग्राहकांची सोय वाढवणे, वाहनांच्या सुरक्षिततेला प्रोत्साहन देणे आणि प्रवासी कार मालकांसाठी अधिक आरामदायी ड्रायव्हिंगचा अनुभव देणे हा आहे.
पुण्यातील वाढत्या नागरी गतिशीलतेच्या गरजा आणि विस्तारणाऱ्या ऑटोमोबाईल मार्केटमुळे, प्रीमियम टायर सोल्यूशन्ससाठी हे शहर एक मोठी संधी उपलब्ध करते. ३० हून अधिक वर्षांच्या अनुभवा पाठीशी असलेले दर्शन टायर्स हे शहरातील सर्वात मोठ्या टायर डीलर्सपैकी एक असून अल्ट्रा-हाय परफॉर्मन्स (UHP) टायर्सच्या विक्रीसाठी एक प्रमुख नाव आहे. पुण्यात १० शोरूम्स असलेल्या या कंपनीकडे केवळ प्रीमियम टायर ब्रँड्स उपलब्ध असून उत्कृष्ट ग्राहक सेवेसाठी ती ओळखली जाते.
४,५०० चौरस फुटांचे हे सुविधा केंद्र विशेषतः पॅसेंजर कार टायर्ससाठी समर्पित आहे आणि ते क्रॉसकॉन्टॅक्ट A/T2 टायर्ससह कॉन्टिनेंटल इंडियाच्या नवीनतम नवकल्पना उपलब्ध आहेत. ॲडव्हान्स गॅरेज तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या आऊटलेटमध्ये नायट्रोजन इन्फ्लेशन, कॉम्प्युटराइज्ड टायर चेंजर्स, व्हील बॅलन्सर्स आणि व्हील अलाइनमेंट सिस्टीम उपलब्ध आहेत; ज्यामुळे शहरातील प्रीमियम टायर विक्री आणि व्यावसायिक टायर देखभालीसाठी हे एक सर्वोत्कृष्ट केंद्र बनले आहे.
“पुण्यातील आमच्या नवीन सीपीडी आउटलेटचे उद्घाटन या भागातील ग्राहकांसाठी प्रीमियम टायर सोल्यूशन्स आणि व्यावसायिक सेवा अधिक जवळ आणण्याच्या आमच्या वचनबद्धतेला बळकट करते,” असे कॉन्टिनेंटल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक नेव्हिन अस्लान ओझकान म्हणाले. “आमच्या ‘इन द मार्केट, फॉर द मार्केट’ या तत्त्वज्ञानाने प्रेरित होऊन, आम्ही आमची रिटेल उपस्थिती मजबूत करणे सुरूच ठेवले आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील ग्राहकांसाठी आमचे प्रगत टायर तंत्रज्ञान, सुरक्षितता, आरामदायीपणा आणि परफॉर्मन्स अधिक सुलभ करत आहोत.”
“पुण्यात या नवीन सीपीडी आउटलेटच्या शुभारंभाद्वारे कॉन्टिनेंटल इंडियासोबतचे आमचे संबंध अधिक मजबूत करताना आम्हाला आनंद होत आहे,” असे दर्शन टायर्सचे मालक नयन नानासाहेब गांधी म्हणाले. “३० हून अधिक वर्षांचा अनुभव आणि शहराभरात १० शोरूम्ससह, आम्ही प्रीमियम टायर ब्रँड्स आणि विश्वासार्ह सेवेवर लक्ष केंद्रित करून ग्राहकांशी घट्ट नाते निर्माण केले आहे. ४,५०० चौरस फुटांचे हे नवीन केंद्र कॉन्टिनेंटलच्या प्रीमियम टायर उत्पादनांना प्रगत गॅरेज तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक वाहन देखभाल सेवांशी जोडते, ज्यामुळे आम्हाला संपूर्ण पुण्यातील ग्राहकांना अधिक सोयीस्कर आणि विश्वासार्ह अनुभव देणे शक्य होईल.”
हा शुभारंभ भारतातील कॉन्टिनेंटलच्या ‘कॉन्टिनेंटल प्रीमियम ड्राईव्ह’ नेटवर्कच्या सातत्याने होणाऱ्या विस्तारातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यामध्ये आता देशभरात २०० हून अधिक ब्रँड स्टोअर्स समाविष्ट आहेत. हा विस्तार कंपनीची प्रीमियम टायर श्रेणी आणि व्यावसायिक सेवांचा अनुभव देशभरातील ग्राहकांसाठी अधिक सुलभ करण्याच्या वचनबद्धतेला बळकट करतो.
कॉन्टिनेंटल ही एकही एक अग्रगण्य टायर उत्पादक आणि उद्योगातील विशेषज्ञ कंपनी आहे. . १८७१ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीने २०२५ मध्ये १९.७ अब्ज युरोची विक्री नोंदवली असून सध्या ५४ देश आणि बाजारपेठांमध्ये सुमारे ७६,००० लोक कार्यरत आहेत.
टायर ग्रुप क्षेत्रातील टायर सोल्यूशन्स गतिशीलता अधिक सुरक्षित आणि स्मार्ट बनवतात. त्यांच्या प्रीमियम पोर्टफोलिओमध्ये कार, ट्रक, बस, दुचाकी आणि विशेष टायर्ससह फ्लिट्स आणि टायर रिटेलर्ससाठी स्मार्ट सोल्यूशन्स आणि सेवांचा समावेश आहे. कॉन्टिनेंटल १५० हून अधिक वर्षांपासून उत्कृष्ट कामगिरी करत असून ती जगातील सर्वात मोठ्या टायर उत्पादकांपैकी एक आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये, टायर ग्रुप क्षेत्राने १३.८ अब्ज युरोची विक्री नोंदवली. कॉन्टिनेंटलच्या टायर ग्रुप क्षेत्रात सध्या जगभरात सुमारे ५३,००० लोक कार्यरत असून त्यांची १९ उत्पादन आणि
१६ विकास केंद्रे आहेत.


