Monday, November 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंदाई मोटर इंडिया तर्फे देशभरात ‘ह्युंदाई स्मार्ट केअर क्लिनिक’ सेवा शिबिराचे आयोजन

ह्युंदाई मोटर इंडिया तर्फे देशभरात ‘ह्युंदाई स्मार्ट केअर क्लिनिक’ सेवा शिबिराचे आयोजन

 

 

गुरुग्राम, २३ नोव्हेंबर २०२६: ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडने (एचएमआयएल) देशभरातील आपल्या अधिकृत सेवा केंद्रांमध्ये ‘ह्युंदाई स्मार्ट केअर क्लिनिक’ या विशेष सेवा शिबिराचे आयोजन करण्याची घोषणा केली आहे. हे शिबिर २४ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. या १५ दिवसांच्या उपक्रमाचा उद्देश ग्राहकांना वाहनांची नियमित देखभाल करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि विशेषतः हिवाळ्याच्या हंगामात त्यांची वाहने सुस्थितीत ठेवण्यास मदत करणे हा आहे.या शिबिरादरम्यान ग्राहकांना ५० पॉइंट्सची मोफत वाहन आरोग्य तपासणी करण्याची सुविधा मिळणार आहे. तसेच नियमित वाहन देखभाल, विस्तारित वॉरंटी, रोडसाइड असिस्टन्स आणि विविध मूल्यवर्धित सेवांवर आकर्षक ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे.‘ह्युंदाई स्मार्ट केअर क्लिनिक’ या सेवा शिबिराच्या माध्यमातून वाहनांची प्रतिबंधात्मक देखभाल अधिक सुलभ करण्यासोबतच ग्राहकांना विशेष सेवा लाभ देण्याचा ह्युंदाईचा प्रयत्न आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments