पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासकामांचा आढावा; पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, प्रदूषण आणि वाहतूक समस्यांवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना…
पिंपरी दि.२३ नोव्हेंबर २०२६:- दिवंगत अजितदादा पवार यांचे पिंपरी-चिंचवड शहराशी अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. या शहराच्या विकासासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले आणि शहराला विकासाची दिशा दिली. त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे पक्षीय मतभेद बाजूला ठेवून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने एकजुटीने काम करावे, असे आवाहन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकासकामांचा आढावा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज महानगरपालिका मुख्य प्रशासकीय कार्यालयात घेतला.
यावेळी महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, पदाधिकारी, उपमुख्यमंत्री यांचे सचिव राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी,नगरसदस्य, नगरसदस्या ,अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम,विक्रांत बगाडे आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पाणीपुरवठा, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, सामाजिक व औद्योगिक विकास यांसह सुमारे १९ विविध क्षेत्रांतील कामांचे सादरीकरण केले. शहराच्या वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करून भविष्यातील गरजांनुसार विकासाचे नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे पवार यांनी नमूद केले.
शहरातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारी, कमी दाबाने होणारा पुरवठा, गढूळ पाणी आणि गृहनिर्माण सोसायट्यांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले. अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे उद्भवू शकणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच सूक्ष्म नियोजन करावे. तसेच दुष्काळसदृश परिस्थितीमुळे इतर भागांतून होणारे संभाव्य स्थलांतर लक्षात घेऊनही आवश्यक तयारी करावी, अशा सूचना त्यांनी केल्या.
मोशी कचरा डेपोतील दुर्घटना अत्यंत वेदनादायी होती. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छ सर्वेक्षणात महानगरपालिकेला चांगले यश मिळाले असले तरी कचरा व्यवस्थापनात आणखी सुधारणा आवश्यक आहे. पवना व इंद्रायणी नदीचे प्रदूषण, सांडपाणी व्यवस्थापन, हवेचे प्रदूषण, वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे, अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे या प्रश्नांवरही प्रशासन व लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील आरोग्य सुविधांचे बळकटीकरण, औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास, गुंतवणूक व रोजगाराच्या संधी वाढविणे तसेच कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. सुरू असलेली सर्व विकासकामे गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि निर्धारित वेळेत पूर्ण व्हावीत, यावर त्यांनी भर दिला. नाशिक फाटा ते राजगुरुनगर एलिव्हेटेड रोडच्या उद्घाटनाबाबत मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा झाली असून लवकरच या प्रकल्पाचे उद्घाटन होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची ‘श्रीमंत महानगरपालिका’ ही ओळख कायम ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन करताना राज्य शासनाच्या स्तरावरील प्रलंबित प्रश्नांवर मुख्यमंत्री महोदयांसोबत स्वतंत्र बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. शहराच्या विकासासाठी आणि महानगरपालिकेच्या पाठीशी आपण ठामपणे उभे असून, अजितदादांनी पाहिलेले विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या.