Monday, November 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे विभागीय शालेय मॉडर्न पेंटाथलॉन क्रीडा स्पर्धेत खेळाडूंकडून वेग आणि उत्कृष्ट क्रीडा...

पुणे विभागीय शालेय मॉडर्न पेंटाथलॉन क्रीडा स्पर्धेत खेळाडूंकडून वेग आणि उत्कृष्ट क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन

 

 

 

पुणे दि.२३: शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयातंर्गत जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांचे वतीने प्रतिवर्षी शालेय खेळांडूच्या क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी व भविष्यातील राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत या उद्देशाने तालुकास्तर, जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तर व राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन विविध खेळ व वयोगटात करण्यात येते.

 

या वर्षातील पुणे विभागीय शालेय मॉडर्न पेंटाथलॉन क्रीडा स्पर्धा ( १७/१९ वयोगटातील मुले व मुली ) आयोजन शारदाबाई पवार विद्यानिकेतन डे स्कूल व पुणे जिल्हा मॉडर्न पेंटाथलॉन असोसिएशन यांच्या वतीने शारदानगर, बारामती, या ठिकाणी नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये पुणे ग्रामीण,पुणे शहर,पिंपरी चिंचवड शहर, सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यातील खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत १७ व १९ वर्षांखालील मुले व मुलींच्या गटातील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. खेळाडूंनी या वेळी वेग, सहनशक्ती आणि उत्कृष्ट क्रीडा-कौशल्याचे प्रदर्शन घडवले.

 

स्पर्धेचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेचे क्रीडा पर्यवेक्षक महेश तिकोने यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा स्पर्धा प्रमुख शिवाजी कोळी, ननवरे सर, श्री कोठावळे सर व संघटनेचे हर्षद इनामदार आणि सौरभ पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा शिक्षक, पंच, प्रशिक्षक आणि पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

विभागीय स्तरावरील या स्पर्धेमुळे शालेय खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याची मोठी संधी मिळाली. तसेच खेळाडूंना राज्य पातळीवर प्राविण्य मिळविण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विजयी खेळाडू दि.२८ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल,जि.सातारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

 

स्पर्धा विजेते अनुक्रमे – वैयक्तिक विजेते ( राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली खेळाडू ) –

१७ वयोगटातील मुले – प्रथम- ओमराजे पाटील ( सोलापूर ), व्दितीय- वेदांत सामलेटी (सोलापूर) ,तृतीय- रूद्र गरासे ( पुणे शहर ), चतुर्थ- शिवांश गायकवाड ( पुणे शहर ).

 

१७ मुली – प्रथम- महती पाटील ( पुणे ), व्दितीय- जानवी केंगार (सोलापूर ) ,तृतीय- उज्जवला सोमा ( सोलापूर ), चतुर्थ- रूही बलदोटा ( सोलापूर ).

 

१९ मुले – प्रथम- सार्थक आजबे ( अहिल्यानगर ), व्दितीय- अर्णव पळशीकर ( अहिल्यानगर ) ,तृतीय – सचिन वरठा ( अहिल्यानगर), चतुर्थ- विर उनावणे (पुणे).

 

१९ मुली – प्रथम- श्रावणी निलवर्ण ( पुणे शहर ), व्दितीय- अंशिका सोलनकर ( सोलापूर शहर ) ,तृतीय- सुहानी ओसवाल ( पुणे शहर ), चतुर्थ- स्वप्नप्रिती कोठावळे (पुणे).

 

००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments