Monday, November 23, 2026
Google search engine
HomeUncategorized*पुण्यात रविवारी मोफत ‘सीपीआर’ प्रशिक्षण आणि औषधी वनस्पतींचे प्रदर्शन*

*पुण्यात रविवारी मोफत ‘सीपीआर’ प्रशिक्षण आणि औषधी वनस्पतींचे प्रदर्शन*

 

 

पुणे, ता. २३ : हृदयविकाराच्या आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी ‘सीपीआर’ या जीवनरक्षक तंत्राचे प्रशिक्षण नागरिकांपर्यंत पोहोचावे, यासाठी रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी फर्ग्युसन कॉलेज कॅम्पस, एफ. सी. रोड येथे मोफत सीपीआर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत होणाऱ्या या उपक्रमासोबतच हृदयाचे आरोग्य, भारतीय ज्ञानपरंपरा आणि उपयुक्त औषधी वनस्पतींचे विनामूल्य प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. ‘हृदयम्’ From Evidence to Action: An Interdisciplinary Approach to Cardiovascular Health’ या राष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने हा कार्यक्रम होत आहे. आरोग्य भारती (पश्चिम महाराष्ट्र प्रांत), भागीरथी मेडिकल फाउंडेशन आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.

 

हृदयक्रिया बंद पडण्यासारख्या प्रसंगी प्रत्येक मिनिट मोलाचे असते. केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतात हृदयक्रिया बंद पडलेल्या रुग्णांपैकी केवळ १.३ ते ९.८ टक्के रुग्णांनाच घटनास्थळी उपस्थित व्यक्तींकडून सीपीआर मिळते. सीपीआर देण्यास होणाऱ्या प्रत्येक मिनिटाच्या विलंबामुळे रुग्णाच्या जगण्याची शक्यता सुमारे १० टक्क्यांनी घटते; मात्र वेळेत सीपीआर दिल्यास जगण्याची शक्यता दोन ते तीन पटींनी वाढू शकते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी हे कौशल्य आत्मसात करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या परिषदेला राष्ट्रीय भारतीय चिकित्सा पद्धती आयोग (NCISM), महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (नाशिक), आयुष संचालनालय, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल यांचे अनुमोदन आहे. देशभरातून अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, फिजिओथेरपी, नर्सिंग आणि योग या शाखांतील तज्ज्ञ, डॉक्टर, संशोधक व विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत.

 

सीपीआर प्रशिक्षणासाठी पूर्वनोंदणी अनिवार्य असून सहभाग विनामूल्य आहे. इच्छुकांनी https://forms.gle/5NcFzuWVdKANnS4s9 या लिंकवर नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी दीपक अष्टपुत्रे (९६६५४८४३२७), अमेय वाघ (८४८३९१३७२६) किंवा सतीश कालगावकर (७६२०४५८१३०) यांच्याशी संपर्क साधावा. ‘सीपीआर शिका, जीव वाचवा!’ या संदेशासह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments