Tuesday, November 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedडेक्कन जिमखाना अ‍ॅक्वाटिक्स होम गाला स्पर्धेत डेक्कन जिमखाना यलो शार्क्स संघाला सर्वसाधारण...

डेक्कन जिमखाना अ‍ॅक्वाटिक्स होम गाला स्पर्धेत डेक्कन जिमखाना यलो शार्क्स संघाला सर्वसाधारण विजेतेपद जलतरण स्पर्धेत डेक्कन जिमखाना ग्रीन टायटन्स संघाला विजेतेपद

पुणे, 24 नोव्हेंबर 2026: डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आणि पुणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेच्या मान्यतेखाली आयोजित करण्यात आलेल्या डेक्कन जिमखाना अ‍ॅक्वाटिक्स होम गाला जलतरण स्पर्धेत डेक्कन जिमखाना यलो शार्क्स संघाने १३५९ गुणांसह अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.

डेक्कन जिमखाना येथील टिळक जलतरण तलावावर पार पडलेल्या या स्पर्धेत डेक्कन जिमखाना ग्रीन टायटन्स संघाने १३१४ गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला.

 

जलतरण स्पर्धेत डेक्कन जिमखाना ग्रीन टायटन्स संघाने १३१४ गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला. तर, डेक्कन जिमखाना यलो शार्क्स संघाने १२५४ गुणांसह दुसरे स्थान पटकावले. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण छत्रपती पुरस्कार विजेते संजय करंदरीकर, डेक्कन जिमखानाचे सर चिटणीस मिहीर केळकर आणि छत्रपती पुरस्कार विजेते मनोज एरंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी टिळक टँकचे सचिव शौर्य करंदीकर, स्पर्धेचे अध्यक्ष नीर चौहान, स्पर्धेचे सचिव मोहित मारणे आणि डेक्कन अॅक्वेटिक्स अकादमीचे इन्चार्ज रोहित बर्वे उपस्थित होते.

 

 

विविध गटातील विजेते खेळाडू:

५ वर्षांखालील मुले: अगस्त्य कुलकर्णी (२० गुण, पर्पल लिजेंड्स);

५ वर्षांखालील मुली: प्रणव पारेख (२० गुण, यलो शार्क्स);

 

६ वर्षांखालील मुले: आर्यवीर कोतमिरे (३४ गुण, ग्रीन टायटन्स);

६ वर्षांखालील मुली: इरा भोसले (४० गुण, रेड वॉरियर्स);

 

७ वर्षांखालील मुले: अगस्त्य करंदीकर (३५ गुण, ग्रीन टायटन्स);

७ वर्षांखालील मुली: रमा पांडकर (४० गुण, रेड वॉरियर्स);

 

८ वर्षांखालील मुले: परीक्षित ब्रह्मे (४० गुण, ग्रीन टायटन्स);

८ वर्षांखालील मुली: इंद्रायणी पवार (४० गुण, पर्पल लिजेंड्स);

 

९ वर्षांखालील मुले: निमिष करडे (६० गुण, ग्रीन टायटन्स);

९ वर्षांखालील मुली: अस्मी बर्वे (५४ गुण, रेड वॉरियर्स);

 

१० वर्षांखालील मुले: अर्जुन कुर्डूकर (६० गुण, रेड वॉरियर्स);

१० वर्षांखालील मुली: आनंदिता सरगफ (५१ गुण, ग्रीन टायटन्स);

 

१२ वर्षांखालील मुले: सत्यजीत सिंग मोहिते (६० गुण, ग्रीन टायटन्स);

१२ वर्षांखालील मुली: क्रिशा दाते (६० गुण, यलो शार्क्स);

 

१४ वर्षांखालील मुले: मेधांश ठाणे (६० गुण, रेड वॉरियर्स);

१४ वर्षांखालील मुली: लावण्या करडे (५० गुण, यलो शार्क्स);

 

१६ वर्षांखालील मुले: वरद भोर (६० गुण, पर्पल लिजेंड्स);

१६ वर्षांखालील मुली: झील मलानी (६० गुण, पर्पल लिजेंड्स);

 

१८ वर्षांखालील मुले: वरद मारणे (५०गुण, ग्रीन टायटन्स);

१८ वर्षांखालील मुली: शांभवी टंकसाळे (६०गुण, ग्रीन टायटन्स);

 

वरिष्ठ मुले: अर्णव भाडेकर (६०गुण, ग्रीन टायटन्स);

वरिष्ठ मुली: ऋजुता राजाध्यक्ष

(६० गुण, पर्पल लिजेंड्स).

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments