Tuesday, November 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedआयआरडीएआयच्या तक्रार निवारण महिन्याअंतर्गत बजाज लाइफ इन्शुरन्सतर्फे पुण्यात तक्रार निवारण शिबिराचे आयोजन

आयआरडीएआयच्या तक्रार निवारण महिन्याअंतर्गत बजाज लाइफ इन्शुरन्सतर्फे पुण्यात तक्रार निवारण शिबिराचे आयोजन

 

 

 

 

पुणे, 23 नोव्हेंबर 2026: भारतातील आघाडीच्या खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या बजाज लाइफ इन्शुरन्सने भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या (आयआरडीएआय) तक्रार निवारण महिना (GRM) या उपक्रमाचा एक भाग म्हणून 20 नोव्हेंबर 2026 रोजी पुण्यात विमा उद्योगस्तरीय तक्रार निवारण शिबिराचे आयोजन केले. या उपक्रमात विमा क्षेत्रातील विविध प्रमुख भागधारक एकत्र आले. प्रलंबित विमाधारकांच्या तक्रारींचे निराकरण करणे, विमा दावे निकाली लावायला प्रोत्साहन देणे आणि ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.

 

 

 

विमान नगर येथील हयात रीजन्सी येथे आयोजित करण्यात आलेल्या या पुणे शिबिरात जीवन विमा, सर्वसाधारण विमा आणि आरोग्य विमा क्षेत्रातील 41 कंपन्यांनी सहभाग घेतला. या शिबिरात आयआरडीएआय, विमा लोकपाल, विमा लोकपाल परिषद तसेच जीवन विमा, सर्वसाधारण विमा आणि आरोग्य विमा कंपन्यांसह विमा क्षेत्रातील विविध प्रमुख भागधारक एकत्र आले. त्यामुळे विमाधारकांना एकाच ठिकाणी विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधण्याची आणि आपल्या तक्रारींचे निराकरण करून घेण्याची संधी उपलब्ध झाली. सहभागी विमा कंपन्यांनी एकूण 417 विमाधारकांच्या तक्रारींचे निराकरण केले आणि त्यायोगे 6.07 कोटी रु. रकमेचे दावे निकाली काढले. या उपक्रमांतर्गत विविध शहरांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या तक्रार निवारण शिबिरांमध्ये बजाज लाइफ इन्शुरन्सने 5.85 कोटी रु. किमतीचे विमा दावे निकाली काढण्यास मदत केली.

 

 

 

आयआरडीएआयचे मुख्य सरव्यवस्थापक श्री. ए. रामणो राव, पुण्याच्या विमा लोकपाल सुश्री रचना खरे आणि बजाज लाइफ इन्शुरन्स लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष श्री. अनिल पीएम यांनी उपस्थितांना संबोधित केले. या कार्यक्रमात आयआरडीएआयच्या अध्यक्षांचे ध्वनिचित्रमुद्रित संदेशाचे सादरीकरण करण्यात आले. तसेच विविध विमा कंपन्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील विमाधारकांना विमा दाव्यांच्या रकमेचे वितरण केले. विमा कंपन्यांना त्यांच्या संबंधित क्षेत्रांतील विमाधारकांना दाव्यांची रक्कम वितरित करण्याची संधीही या शिबिराच्या माध्यमातून मिळाली.

 

 

 

या उपक्रमाविषयी बोलताना बजाज लाइफ इन्शुरन्सचे कायदा, अनुपालन आणि फसवणूक प्रतिबंध विभागाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. अनिल पीएम म्हणाले, “विमाधारकांशी होणारा प्रत्येक संवाद हा ग्राहकांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास अधिक दृढ करण्याची एक संधी असते. तक्रारींचे निराकरण करणे महत्त्वाचे असले, तरी त्या तक्रारींमागील मूळ समस्या समजून घेणे आणि त्यांचे मूळ कारण दूर करणे तितकेच गरजेचे आहे. तक्रार निवारण महिन्यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून आम्हाला विमाधारकांशी अधिक जवळून संवाद साधता येतो. तसेच अधिक सुलभ, सुरळीत आणि तत्पर सेवा अनुभव देण्यासाठी आमच्या कार्यपद्धती अधिक सक्षम करता येतात.”

 

 

 

पुण्यातील शिबिराचे आयोजन करण्यासोबतच बजाज लाइफ इन्शुरन्सने विविध शहरांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या तक्रार निवारण महिना (GRM) शिबिरांमध्येही सहभाग घेतला. यामधून विमाधारकांशी संवाद साधणे आणि त्यांच्या प्रलंबित तक्रारींचे निराकरण करणे या उद्योगस्तरीय प्रयत्नांना कंपनीने सहकार्य केले.

 

 

 

या उपक्रमातील सहभागाच्या माध्यमातून बजाज लाइफ इन्शुरन्सने विमाधारकांचे हितसंरक्षण आणि त्यांच्या तक्रारींचे तत्परतेने निवारण करण्याप्रती असलेली आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली आहे. ‘2047 पर्यंत सर्वांसाठी विमा’ या संकल्पनेअंतर्गत विमाधारकांना केंद्रस्थानी ठेवणारी विमा व्यवस्था निर्माण करण्याच्या आयआरडीएआयच्या दृष्टिकोनाला कंपनीचा हा सहभाग पाठबळ देणारा आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments