Tuesday, November 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedमेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये सहा महिन्यांत १० प्रीमॅच्युअर बाळांवर यशस्वी उपचार; तीन जुळ्या बाळांचाही...

मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये सहा महिन्यांत १० प्रीमॅच्युअर बाळांवर यशस्वी उपचार; तीन जुळ्या बाळांचाही समावेश

 

 

पुणे, नोव्हेंबर २०२६ : मुदतपूर्व जन्मलेल्या बाळांना जन्मानंतरच्या सुरुवातीच्या काळात विशेष वैद्यकीय देखभाल आणि उपचारांची आवश्यकता असते. अशा बाळांसाठी वेळेवर उपचार, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा महत्त्वपूर्ण ठरतात. पुण्यातील मेडिकव्हर हॉस्पिटल, भोसरी येथील नवजात शिशू अतिदक्षता विभागाने (एनआयसीयू) गेल्या सहा महिन्यांत १० प्रीमॅच्युअर बाळांवर यशस्वी उपचार करून त्यांचे प्राण वाचवले आहेत. यामध्ये तीन जुळ्या बाळांचाही समावेश आहे.

 

दरवर्षी १७ नोव्हेंबर हा जागतिक प्रीमॅच्युरिटी दिन म्हणून पाळला जातो. मुदतपूर्व जन्मलेल्या बाळांच्या आरोग्याविषयी जनजागृती करणे आणि त्यांच्या उपचारांसाठी आवश्यक असलेल्या विशेष वैद्यकीय सुविधांचे महत्त्व अधोरेखित करणे हा या दिनामागील प्रमुख उद्देश आहे.

 

गर्भधारणेचे ३७ आठवडे पूर्ण होण्यापूर्वी जन्मलेल्या बाळांना प्रीमॅच्युअर किंवा मुदतपूर्व जन्मलेली बाळे म्हटले जाते. अशा बाळांचे वजन कमी असणे, फुफ्फुसांची पूर्ण वाढ न झाल्यामुळे श्वसनाचा त्रास होणे, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यात अडचणी येणे तसेच संसर्गाचा धोका अशा विविध आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात.

 

याबाबत बोलताना मेडिकव्हर हॉस्पिटलचे कन्सल्टंट निओनेटोलॉजिस्ट डॉ. दत्तात्रय कुलकर्णी म्हणाले, “मुदतपूर्व जन्मलेल्या बाळांसाठी जन्मानंतरचे पहिले काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. या काळात श्वसन, शरीराचे तापमान, पोषण आणि संसर्ग यांचे सातत्याने निरीक्षण करणे आवश्यक असते. प्रत्येक बाळाची प्रकृती वेगळी असल्याने त्यानुसार उपचारपद्धती ठरवावी लागते. योग्य वेळी एनआयसीयूमध्ये दाखल करून तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार केल्यास अशा बाळांच्या जगण्याची आणि निरोगी वाढीची शक्यता वाढते.”

 

मेडिकव्हर हॉस्पिटलच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शरयू मिरजी म्हणाल्या, “गर्भधारणेदरम्यान नियमित तपासण्या आणि गर्भवती महिलेच्या आरोग्याचे योग्य निरीक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उच्च जोखमीची गर्भधारणा वेळीच ओळखल्यास संभाव्य गुंतागुंत कमी करण्यासाठी योग्य नियोजन करता येते. मुदतपूर्व प्रसूतीची शक्यता असल्यास आई आणि बाळ या दोघांच्या सुरक्षिततेसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ आणि निओनेटोलॉजिस्ट यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे.”

 

मेडिकव्हर हॉस्पिटलच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नूतन वंजारे म्हणाल्या, “प्रत्येक गर्भधारणेची परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे गर्भवती महिलांनी नियमित वैद्यकीय तपासण्या, डॉक्टरांचा सल्ला आणि आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. मुदतपूर्व प्रसूतीची लक्षणे दिसल्यास विलंब न करता वैद्यकीय मदत घेणे महत्त्वाचे आहे. आईला योग्य मार्गदर्शन आणि बाळाला जन्मानंतर तज्ज्ञांची विशेष देखभाल मिळाल्यास उपचार अधिक प्रभावी ठरू शकतात.”

 

मेडिकव्हर हॉस्पिटलच्या एनआयसीयू विभागात निओनेटोलॉजिस्ट, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि आधुनिक वैद्यकीय सुविधांच्या माध्यमातून नवजात बालकांवर उपचार केले जातात. गेल्या सहा महिन्यांत दहा प्रीमॅच्युअर बाळांवर यशस्वी उपचार करताना तीन जुळ्या बाळांच्या प्रकरणांमध्येही विशेष वैद्यकीय देखभाल करण्यात आली. या यशात डॉक्टर, परिचारिका आणि संपूर्ण एनआयसीयू टीमचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.

 

या कामगिरीतून मुदतपूर्व जन्मलेल्या बाळांसाठी वेळेवर निदान, योग्य उपचार आणि विशेष नवजात शिशू अतिदक्षता विभागाची उपलब्धता किती महत्त्वाची आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

 

मेडिकव्हर हॉस्पिटल, भोसरी, पुणे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments