Wednesday, November 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedआळंदी यात्रा व विविध सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी*

आळंदी यात्रा व विविध सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी*

 

 

पुणे, दि.२५: आगामी श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी संजीवन सोहळा व विविध सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ च्या कलम ३७ (१)(३) अन्वये ८ डिसेंबर २०२६ पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

 

या कालावधीत कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, ज्वलनशील द्रव पदार्थ बाळगणे, दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, काचेचे तुकडे, काचेच्या रिकाम्या बाटल्या, शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू सोबत बाळगणे, कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे, पुढाऱ्यांच्या चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, मोठमोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे यामुळे सभ्यता अगर नीतिमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल अशा पद्धतीने आवेशपूर्ण भाषणे करणे, अविर्भाव करणे या कृत्यांवर बंदी घालण्यात आली आहे.

 

तसेच पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांचे पूर्वपरवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील असे पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी कळविले आहे.

 

००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments