Thursday, November 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारतीय संस्कृती संवर्धक संस्थेच्या वतीने मोतीबाग येथे संविधान दिन साजरा.

भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेच्या वतीने मोतीबाग येथे संविधान दिन साजरा.

 

 

पुणे

(प्रतिनिधी)

भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेच्या वतीने आज दि २६ नोव्हेंबर “संविधान दिन” निमित्त मोरोपंत पिंगळे सभागृह, मोतीबाग,येथे मातृशक्तीने मातृशक्तींच्या सक्षमीकरणासाठी संविधानाचे वाचन असा कार्यक्रम घेण्यात आला.

कसबा भाग कुटुंब प्रबोधन गतिविधीच्या १२ मातृशक्तींचा यात सहभाग होता.

भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेचे विश्वस्त राजेंद्र वालेकर यांनी प्रस्तावना केली त्यानंतर अध्यक्ष राजीव जोशी यांनी

संविधानासंदर्भात माहिती सांगितली.उपस्थित सर्वांनी भारत माता पूजन,डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधानाचे पूजन केले. तसेच २६/११च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील हुताम्यांना भावांजली वाहिली. तद्नंतर “संविधान उद्देशाचे” वाचन झाले.भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेचे अध्यक्ष राजीव जोशी यांनी आभार व्यक्त केले . राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कसबा भगाचे कार्यवाह राहुल पुंडे,मोतीबाग नगर कार्यवाह प्रमोद वसगडेकर,

संस्थेचे कार्यवाह प्रसाद खेडकर,भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेचे विश्वस्त प्रकाश आठवले,डॉ मोरेश्वर गद्रे इ.उपस्थित होते.चहा न्याहारीने कार्यक्रमाची सांगता झाली .

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments