२१ डिसेंबर २०२३: टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी (टीपीईएम) या टाटा मोटर्सची उपकंपनी आणि भारतातील ईव्ही क्रांतीमध्ये अग्रस्थानी असलेल्या कंपनीने आज ईव्ही ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी प्रमुख ऑटो हब्स सेक्टर १४ व सोहना रोड, गुरूग्राम येथे TATA.ev स्टोअर्सचे उद्घाटन केले. हे स्टोअर्स जनतेसाठी ७ जानेवारी २०२४ पासून सुरू होतील.
भारतातील इलेक्ट्रिक वेईकल्स विकासाच्या दिशेने वाटचाल करत असताना ग्राहकवर्गामध्ये झपाट्याने वाढ होत आहे, जेथे ईव्ही मालक प्रगत तंत्रज्ञान, शाश्वत पद्धती व वैयक्तिकृत सेवांच्या एकत्र मिळण्याची मागणी करत आहेत. या विकसित होत असलेल्या ट्रेण्ड्सशी बांधील राहत टीपीईएम आपली नवीन ब्रॅण्ड ओळख विक्री व सर्विस अनुभवाच्या प्रत्यक्ष सादरीकरणासाठी विस्तारित करत आहे. पारंपारिक चार-चाकी शोरूम्समध्ये विशिष्ट परिवर्तन करत स्टोअर्स शाश्वतता, समुदाय व तंत्रज्ञान या मुलभूत मूल्यांना अनुसरून डिझाइन करण्यात आले आहेत. या शोरूम्समध्ये ‘मूव्ह विथ मीनिंग’ तत्त्वाचा समावेश असेल आणि ईव्ही समुदायाला स्वागतार्ह व सर्वोत्तम सुविधा देतील.
नवीन शोरूम्सच्या उद्घाटनाबाबत मत व्यक्त करत टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्स लि. आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्रा म्हणाले, ”१ लाखाहून अधिक टाटा ईव्ही ग्राहकांकडून अभिप्राय गोळा केल्यानंतर आम्हाला समजले की, ईव्ही ग्राहक अद्वितीय ग्राहक अनुभवाचा शोध घेत आहेत. ते पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाबाबत, तसेच ड्रायव्हिंग व इच्छित अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या खर्चाबाबत जागरूक आहेत. ही बाब नवीन ब्रॅण्ड ओळखीची मुलभूत तत्त्वे – शाश्वतता, समुदाय व तंत्रज्ञानाशी संलग्न आहे. नवीन प्रमुख शोरूम्स प्रत्यक्ष ब्रॅण्ड तत्त्वाला सादर करतात आणि आम्ही त्या अनुषंगाने ग्राहकांना अनुभव देण्याची योजना आखली आहे. आमची ग्राहकांना सक्षम करण्याची इच्छा आहे, ज्यामुळे आमच्या योजनांमध्ये कस्टमर गॅदरिंग्ज/सर्विसेसची सुविधा देण्यासाठी सुसंगत समुदाय स्पेसची निर्मिती, शाश्वत-केंद्रित वर्कशॉप्स आणि ग्राहकांसाठी इव्हेण्ट्सचा समावेश आहे. हे शोरूम्स ईव्हींची विक्री करण्यासह गुरूग्राममधील कम्युनिटी सेंटर्स देखील बनले आहेत.
आजपासून या दोन शोरूम्ससह सुरूवात करत, तसेच पुढील १२ ते १८ महिन्यांमध्ये अशाप्रकारचे आणखी शोरूम्स सुरू करत आमचा ई-मोबिलिटीवर लक्ष केंद्रित करण्याच्या माध्यमातून ऑटोमोटिव्ह उद्योगामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा मनसुबा आहे.”
टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे मार्केटिंग, सेल्स व सर्विस धोरणाचे प्रमुख विवेक श्रीवत्स म्हणाले, ”स्टोअर्समध्ये इन-स्टोअर अनुभवाचा प्रत्येक पैलू सुधारण्यात आला आहे. डिजिटल, प्रत्यक्ष व मानवी घटक एकत्र येत अद्वितीय संस्मरणीय कार खरेदीचा अनुभव देतात, तसेच प्रत्येक पावलावर आमच्या समुदायाला सरप्राइजचा आनंद देतात. ईव्ही ग्राहकांच्या विविध अपेक्षांना ओळखत इन-स्टोअर अनुभव मैत्रीपूर्ण वातावरणात माहिती, सल्ला व मार्गदर्शन देण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. अनुभवामध्ये वाढ करण्यासाठी आम्ही तंत्रज्ञान क्षमतेचा वापर केला असला तरी मानवी साह्य देखील महत्त्वाचे आहे. नवीन रिटेल भूमिकांपासून आमच्या ब्रॅण्डच्या सारामध्ये सामावलेल्या उत्कट व्यक्तींपर्यंत आमचे इलेक्ट्रिक सेंटर स्वागतार्ह, मैत्रीपूर्ण व धमाल असण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.”
शोरूममधून डिझाइनपासून रचना आणि दैनंदिन कार्यसंचालनापर्यंत शाश्वततेप्रती प्रबळ कटिबद्धता दिसून येते. तसेच या स्टोअर्समधून कंपनी म्हणून शाश्वततेप्रती आमची अविरत कटिबद्धता देखील दिसून येते. वापरण्यात आलेले सर्व प्रमुख मटेरिअल्स रिसायकल केलेले किंवा रिसायक्लेबल आहेत, त्यापैकी अनेक मटेरिअल्स जागतिक ग्रीन सर्टिफायर्सकडून शाश्वततेसह प्रमाणित देखील आहेत. शोरूमची निर्मिती करताना स्थानिक पातळीवरून स्रोत मिळवलेल्या मटेरिअल्सना अधिक प्राधान्य देण्यात आले, ज्यामुळे लांब अंतरापर्यंतच्या, उच्च उत्सर्जन परिवहनावरील अवलंबन मोठ्या प्रमाणात कमी झाले.
या शोरूमचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे समुदाय, हे सेंटर टाटा ईव्ही खरेदी करण्यासाठी, तसेच ब्लू टोकाईकडून कॉफी, ईव्ही खरेदी करणाऱ्या सहकाऱ्यांशी गाठभेट आणि इव्हॉल्व्ह कम्युनिटी कॅलेंडरवर यादीकृत इव्हेण्ट्सना उपस्थिती अशा क्षणांचा आनंद घेण्यासाठी अभ्यागतांना आमंत्रित करण्याकरिता डिझाइन करण्यात आले आहे. यामुळे स्टोअर खरेदीव्यतिरिक्त अर्थपूर्ण परस्परसंवादांसाठी हब देखील आहे.
या डिझाइनमधील तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे तंत्रज्ञान. विचारपूर्वक डिजिटल घटकांचा समावेश करत स्टोअरचा अभ्यागतांना पाठिंबा देण्याचा व उत्साहित करण्याचा मनसुबा आहे. विद्यमान मालकांनी केलेल्या प्रशंसेमधून ईव्हींप्रती समस्या व गैरसमजांना दूर करण्याचा, तसेच टाटा ईव्हींबाबत अधिक माहिती जाणून घेण्यास उत्सुक असलेल्या ग्राहकांना सानुकूल पर्याय प्रदान करण्याचा आणि ईव्हींच्या डिलिव्हरीसाठी आलेल्या कुटुंबियांना वैयक्तिकृत स्वागतार्ह अनुभव देण्याचा कंपनीचा प्रयत्न दिसून येतो.
चार-चाकी ईव्ही विभागात ७१ टक्क्यांहून अधिक मार्केट शेअरसह अग्रणी असलेल्या टीपीईएमने अत्याधुनिक तंत्रज्ञान व नाविन्यपूर्ण उत्पादने सादर करत सतत आपला उत्साह दाखवला आहे. गतीशीलतेच्या भवितव्याला सक्रियपणे आकार देण्यासाठी जबाबदार असलेल्या कंपनीने नुकतेच १ लाख टाटा ईव्हींची विक्री करण्याचा टप्पा पार पाडला. कंपनीचा आपल्या इलेक्ट्रिक वेईकल लाइनअपमध्ये एकसंधी कनेक्टीव्हीटी, अत्याधुनिक डिझाइन, अपवादात्मक कार्यक्षमता आणि सर्वोत्तम सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करत ईव्ही विभागात नवीन बेंचमार्क्स स्थापित करण्याचा मनसुबा आहे. समुदाय, शाश्वतता व तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करत टीपीईएम परिवहनाच्या भवितव्याला नव्या उंचीवर नेत आहे.


