Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedभाजपाचे संकल्प पत्र म्हणजे नुसती घोषणाबाजी – अरविंद शिंदे

भाजपाचे संकल्प पत्र म्हणजे नुसती घोषणाबाजी – अरविंद शिंदे

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाचे लोकसभा निवडणुकीतील संकल्प पत्र जाहीर केले आहे, ती म्हणजे केवळ घोषणाबाजीच आहे. देशाला समर्थपणे पुढे नेत जनतेचा आर्थिक स्तर उंचवण्याची कोणतीही योजना त्यात नाही अशी पतिक्रिया पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आज दिली.

बुलेट ट्रेन, हवाई वाहतूक, सॅटेलाईट टाऊन शिप अशा घोषणांचा सुकाळ या संकल्प पत्रात आहे. वास्तविक देशातील १०० शहरांच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्मार्ट सिटी योजना जाहीर केली होती, त्यात पुण्याचाही समावेश होता ही योजना पूर्ण होण्याच्या आतच आता हि योजना गुंडाळली गेली आहे तसेच यामुळे पुण्याच्या स्मार्ट पणात काहीहिः भर पडलेली नाही त्यामुळेच आता संकल्प पत्रातील सॅटेलाईट टाऊन शिप सारख्या योजनांवर जनतेचा विश्वास बसणार नाही असे ते म्हणाले.

गेल्या १० वर्षात देशातील तरुणांच्या कोट्यावधी नोकर्याऱ्या गेल्या, कोट्यावधी तरुण बेरोजगार झाले दर वर्षी २ कोटी नवे रोजगार देणार असे सांगणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या कडून काहीच अपेक्षा जनतेच्या उरलेल्या नाहीत तसेच या संकल्प पत्राद्वारे देखील जनतेला काही अपेक्षा नाहीत असे अरविंद शिंदे म्हणाले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments