Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedसंकल्प पत्राचे जनतेकडून  थंडे स्वागत – रवींद्र धंगेकर

संकल्प पत्राचे जनतेकडून  थंडे स्वागत – रवींद्र धंगेकर

 

भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीनिमित्त त्यांचे संकल्प पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रकाशित केले. मुख्य म्हणजे हा त्यांचा संकल्प आहे हे वचनपत्र नाही त्यामुळे त्यांच्या संकल्प पत्राबद्दल जनतेच्या मनात काही अपेक्षा नव्हत्या आणि त्यामुळेच त्यांच्या या संकल्प पत्राचे जनतेकडून थंडे स्वागत झाले आहे अशी प्रतिक्रिया पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज व्यक्त केली.

ते म्हणाले की, ‘अच्चे दिन आयेंगे, परदेशातून काला पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये देणार, सन २०२२ मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असे अनेक संकल्प व घोषणा यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या. मात्र त्यातील एकही संकल्प अथवा घोषणा प्रत्येक्षात आली नाही असे रवींद्र धंगेकर म्हणाले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments