पुणे, भारत – रॉयल फिलिप्स (NYSE: PHG, AEX: PHIA), जी आरोग्य तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील सुप्रसिद्ध (लीडिंग) कंपनी आहे, तीने आज पुणे, महाराष्ट्र येथे हेल्थकेअर इनोव्हेशन सेंटर (HIC) च्या विस्तारासाठी एका नवीन संशोधन आणि विकास (R&D) केंद्राचा भूमीपूजन समारंभ केला, ज्यामुळे जगभरात आरोग्यनिगा नवकल्पकतेचे भारतामध्ये वाढते महत्त्व स्पष्ट केले जात आहे. MIDC, चिंचवड येथे 10 एकर जागेत वसलेल्या, आगामी सुविधेमध्ये पहिल्या टप्प्यात अंदाजे 300,000 चौरस फूट कार्यालयाची जागा असेल आणि त्यात 1900 कर्मचारी असतील.
नवीन केंद्र, दोन वर्षांत कार्यान्वित होईल, ज्यामध्ये कंपनीच्या इमेज गाईडेड थेरपी, प्रिसीजन डायग्नोसिस, मॉनिटरींग तसेच स्लीप अँड रेस्पिरेटरी बिजनेस मधील R&D टीमला सहभागी करून घेतले जाईल. सर्व टीमला एका केंद्रात एकत्रित करून, फिलिप्स आवाका, वेग आणि कार्यक्षमतेसाठी अनुकूलता निर्माण करेल आणि संसाधने आणि व्यवसायांमध्ये सर्वोत्कृष्ट कार्य करण्यावर भर देईल. नाविण्यपूर्ण आरोग्य तंत्रज्ञानावर काम करत, नवीन केंद्र 2030 पर्यंत दरवर्षी 2.5 अब्ज लोकांचे जीवन सुधारण्यासाठी फिलिप्सच्या जागतिक मिशनमध्ये योगदान देईल.
शाश्वततेची हमी देण्यासाठी, नवीन केंद्रामध्ये ग्रीन पॉवर असेल, ईव्ही चार्जिंगच्या तरतुदी असतील आणि सायकल चालवण्याला प्रोत्साहन दिले जाईल. फिलिप्सच्या जागतिक स्तरावरील कार्यामध्ये हे एक महत्त्वाचे पाऊल असण्यासोबतच, या केंद्राच्या सुरूवातीमुळे निगा उपलब्ध व्हावी याकरिता विस्तार करण्याच्या दिशेने तंत्रज्ञानाला प्राधान्य असलेले दृष्टीकोन घेण्याची फिलिप्सची वचनबद्धता देखील मजबूत होते.
पुण्यातील हेल्थकेअर इनोव्हेशन सेंटर, बेंगळुरूमधील इनोव्हेशन कॅम्पस, चेन्नईतील ग्लोबल बिजनेस सर्व्हिसेस आणि गुडगावमध्ये मुख्यालय असलेल्या व्यावसायिक टीम, 9000 हून अधिक कर्मचाऱ्यांची एकत्रितपणे नियुक्ती करणे, हे फिलिप्सच्या भारतातील कामकाजाचे महत्वपूर्ण घटक आहेत. भारतातील वैद्यकीय उपकरण उद्योगाला बळकटी देण्याची आरोग्यसेवा उद्दिष्टे पूर्ण करण्याचे ध्येय असल्याने ते भारत सरकारला पाठिंबा देण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहेत.
प्रीसिजन डायग्नोसिस (ऍड इंट्रीम) चे चिफ बिजनेस लीडर आणि इमेज गाईडेड थेरपीचे एक्झिकेटीव व्हाईस प्रेसिडेन्ट आणि चिफ बिजनेस लीडर आणि डायग्नोसिस आणि ट्रीटमेंटसाठी जबाबदार असलेले बर्ट व्हॅन म्युर्स म्हणाले की, “130 वर्षांपूर्वी स्थापना झाल्यापासून, फिलिप्सने भविष्यासाठी नवनवीन गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे. या उद्देशाच्या अनुषंगाने, पुण्यातील आमचे हेल्थकेअर इनोव्हेशन सेंटर भारतीय आणि जागतिक मार्केटच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निराळी आणि दुरदृष्टीची क्षमता देते. हे नवीन केंद्र नाविन्यपूर्ण आणि शाश्वत उपाय देऊन भारतीय आरोग्य सेवा परिसंस्थेला पाठिंबा देण्याची आमची बांधीलकी आणखी मजबूत करेल आणि ग्राहकांसाठी त्याचा फायदा जागतिक स्तरावर घेऊन जाईल”
हेल्थकेयर इनोवेशन सेंटर, पुणे येथील व्हाईस प्रेसिडेन्ट आणि हेड असलेले पीयुष कौशिक याप्रसंगी म्हणाले की, “फिलिप्स हेल्थकेयर इनोव्हेशन सेंटर भारतात आणि भारताबाहेर अशा दोन्ही ठिकाणी काही उत्कृष्ट आरोग्य सेवा आव्हाने समजून घेण्यात आणि त्यांना प्रतिसाद देण्यात अग्रेसर आहे. या नवीन केंद्राच्या सुरूवातीमुळे, आम्ही निश्चीतपणे अधिक नाविन्यपूर्ण विस्तृत उपाय आणि आरोग्य सेवा देणाऱ्यांसह चांगले सहकार्य करू कारण आमचे आरोग्याचे चांगले उपाय देण्याचे सामान्य उद्दिष्ट पूर्ण करण्याची आमची इच्छा आहे.”
2011 मध्ये स्थापना झालेल्या, फिलिप्स हेल्थकेअर इनोव्हेशन सेंटर (HIC), पुणे, मल्टी-मॉडेलिटी हेल्थकेअर R&D आणि स्मार्ट निर्मीती, व्यावसायिकीकरणासाठी ग्राहकांच्या अभिप्रायाचा विचार करून संपूर्ण उत्पादन विकास आणि कार्यात्मक उत्कृष्टतेवर केंद्रित आहे. भारत सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमावर भर देऊन नावीन्यपूर्ण परिसंस्था विकसित करण्यासाठी आणि जागतिक उत्पादन स्तरावर विकास करण्यासाठी तुलनेत स्पर्धात्मक खर्च देण्यासाठी ते वचनबद्ध आहे. 140 देशांमध्ये विस्तार होत असताना, फिलिप्स ही HIC फिलिप्सच्या धोरणात महत्त्वाची भूमिका बजावते.
यापूर्वी नोव्हेंबर 2023 मध्ये फिलिप्स इंडियाने येलाहंका, बेंगळुरू येथे आपल्या नवीन इनोव्हेशन कॅम्पसचे उद्घाटन केले. 650,000 चौरस फुटांच्या सुविधेमध्ये 5,000 हून अधिक व्यावसायिकांना सामावून घेणारे, नवीन कॅम्पस रूग्णांना चांगले अनुभव देणे, आरोग्याबाबत चांगले परिणाम देणे, कर्मचाऱ्यांना चां
गले अनुभव देणे


