पुणे, १८ एप्रिल २०२४ : टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) तर्फे इनोव्हा हायक्रॉस जीएक्स (ओ) ग्रेड पेट्रोल व्हेरियंटमध्ये करण्यात आली आहे. इनोव्हा हायक्रॉस जीएक्स (ओ) ग्रेडसाठी बुकिंग सुरू झाले असून 15 एप्रिल 2024 पासून डिलिव्हरी सुरू होण्याची अपेक्षा आहे. इनोव्हा हायक्रॉस पेट्रोल जीएक्स (ओ) मध्ये फ्रंट एलईडी फॉग लॅम्प, फ्रंट आणि रिअर पार्किंग सेन्सर्स, रिअर डीफॉगर, चेस्टनट थीम असलेली इंटिरिअर्स, डॅशबोर्ड आणि डोअर पॅनेलमध्ये सॉफ्ट टच मटेरियल, मिड-ग्रेड फॅब्रिक सीट्स आणि रिअर सनशेड,ऑटो एसी, 10.1″ इंफोटेनमेंट सिस्टीम, वायरलेस ऍपल कारप्ले, पॅनोरॅमिक व्ह्यू मॉनिटर अशा वैशिष्ट्यांचा समावेश आहे. जीएक्स (ओ) ग्रेड ७ आणि ८ सीट पर्यायांमध्ये असून ब्लॅकिश अगेहा ग्लास फ्लेक, प्लॅटिनम व्हाइट पर्ल, ॲटिट्यूड ब्लॅक मीका,स्पार्कलिंग ब्लॅक पर्ल क्रिस्टल शाइन, सिल्व्हर मेटॅलिक,सुपर व्हाइट आणि अवंत गार्डे ब्रोन्ज मेटॅलिक यासारख्या सात रंगात उपलब्ध करण्यात आली आहे.इनोव्हा हायक्रॉस पेट्रोल जीएक्स (ओ) – ८-सीटरची किंमत 20,99,000 रुपये (एक्स शोरूम) आणि हायक्रॉस पेट्रोल जीएक्स (ओ) – ७-सीटरची किंमत 21,13,000 रुपये (एक्स शोरूम) आहे.


