नाना कचरे यांचे देहावसान…
रघुनाथ म्हस्कूजी तथा नाना कचरे…. आज (२७ एप्रिल २०२४) हे जग सोडून गेले. अखेरपर्यंत त्यांनी संघ कार्याला सर्वोच्च प्राधान्य दिलं. नानांनी आपल्या ८८ वर्षांच्या आयुष्यात कित्येक संस्था उभ्या केल्या तर अनेक संस्थांचे ते आधारवड होते. कौटुंबिक जीवनात पत्नी, तरुण मुलगा गमवला त्यावेळी नाना आतून कोलमडले असतीलही मात्र बाहेरून त्यांनी कधीही तसे दाखवले नाही. सदैव कामात व्यस्त असणारे नाना, समाजऋण मात्र कधीही विसरले नाहीत. आपल्या पुंजीतून त्यांनी अनेकदा सढळ हाताने भरपूर मदत केली, मात्र त्याची कधीही वाच्यता देखील केली नाही. जनसेवा सहकारी बँक म्हणजे नाना कचरे! सहकार भारतीच्या स्थापनेपासूनच्या कार्यात १९७८ पासून, जनसेवा न्यास, अपंग कल्याणकारी संस्था, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना… अशा अनेक संस्थांचे आधारवड म्हणजे नाना !!! असंख्य आठवणींनी अश्रू अनावर होत आहेत… असा सहृदयी माणूस होणे नाही. आता ही सगळी जुनी माणसं या जगाचा निरोप घेत आहेत, ज्यांनी या संस्था उभ्या केल्या, ज्याची फळं आपण चाखत आहोत. कधीही न फिटणारे ऋण… खरोखरच संघ जगलेला असामान्य कार्यकर्ता गेला.
🌸🌸🌸


