Friday, August 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedरॉयल्स, स्पार्टन्सची विजयी सलामी महेश सेवा संघ युवा समितीतर्फे आयोजित...

रॉयल्स, स्पार्टन्सची विजयी सलामी महेश सेवा संघ युवा समितीतर्फे आयोजित न्याती माहेश्वरी फुटबाॅल लीग

पुणे : पी. पी. रॉयल्स आणि आर. आर. स्पार्टन्स संघाने महेश सेवा संघ युवा समितीतर्फे आयोजित न्याती माहेश्वरी फुटबाॅल लीग स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून विजयी सलामी दिली. गरवारे महाविद्यालयाजवळील सेंट्रल माॅल मधील फुटबाॅल ग्राऊंड येथे ही स्पर्धा सुरू आहे.

सुप्रसिद्ध सनदी लेखापाल ललित पोफलीया व उद्योजक संजय बिहाणी मुख्य प्रायोजक न्याती ग्रुपचे डॉ नितीन न्याती यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले. महेश सेवा संघ युवा समितीचे अध्यक्ष विशाल राठी, सचिव केतन जाजू, रजत दरक, वेदांत कारवा, परम जखोटिया, जय मालपाणी यावेळी उपस्थित होते.

पहिल्या लढतीत रॉयल्स संघाने एमजेएम ग्लॅडिएटर्स संघावर ४-० ने मात केली. ही लढत अगदीच एकतर्फी झाली. रॉयल्सच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. लढतीच्या अकराव्या मिनिटाला सर्वेश कारवाने गोल करून रॉयल्स संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर लढतीच्या १९व्या मिनिटाला नवल मालपाणीने गोल करून रॉयल्सची आघाडी २-०ने वाढवली. श्रावण राठीने (२१, २५ मि.) एकापाठोपाठ दोन गोल करून रॉयल्सला ४-०ने विजय मिळवून दिला.

दुसऱ्या लढतीत स्पार्टन्स संघाने दुबई एक्स्पर्ट डायनामोज संघावर ४-१ने विजय मिळवला. लढतीच्या दुसऱ्याच मिनिटाला अंकित मुंदडाने गोल करून स्पार्ट्न्स संघाला आघाडी मिळवून दिली. पुढच्याच मिनिटाला अभिनंदन भुतडाने स्वयंगोल केल्याने स्पार्टन्सची आघाडी २-० ने वाढली. लढतीच्या १३व्या मिनिटाला ओंकार राठीने मैदानी गोल करून स्पार्टन्सची आघाडी ३-०ने भक्कम केली. परम जाखोटियाने २३व्या मिनिटाला गोल करून स्पार्टन्सला ४-० अशी आघाडी मिळवून दिली. पुढच्याच सेकंदांत पार्थ लाहोटीने गोल करून डायनामोज संघाचे खाते उघडले. स्पार्टन्सने ४-१ अशी आघाडी अखेरपर्यंत कायम राखून बाजी मारली.
तिसऱ्या लढतीत अक्षत मुंदडा (११ मि.) आणि स्वराज नवंदरच्या (१६ मि.) गोलच्या जोरावर श्री गणेश वॉरिअर्स संघाने एनपीएव्ही निन्जास संघावर २-०ने मात केली.

यानंतर निहार झंवरच्या दोन गोलच्या जोरावर एमजेएम ग्लॅडिएटर्स संघाने मॉवरिक्स संघावर २-०ने मात केली. यात निहार झंवरने १७व्या मिनिटाला गोल ग्लॅडिएटर्स संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर २४व्या मिनिटाला निहारने दुसरा गोल करून संघाला विजयी केले.

निकाल – श्री गणेश वॉरिअर्स – २ (अक्षत मुंदडा ११ मि., स्वराज नवंदर १६ मि.) वि. वि. एनपीएव्ही निन्जास -०.

पी. पी. रॉयल्स – ४ (सर्वेश कारवा ११ मि., नवल मालपाणी १९ मि., श्रावण राठी २१, २५ मि.) वि. वि. एमजेएम ग्लॅडिएटर्स – ०.

आर. आर. स्पार्टन्स – ४ (अंकित मुंदडा २ मि., अभिनंदन भुतडा स्वयंगोल ३ मि., ओंकार राठी १३ मि., परम जखोटिया २३ मि.) वि. वि. दुबई एक्स्पर्ट डायनामोज – १ (पार्थ लाहोटी २३ मि.)
श्री माव्हरिक्स – ३ (अंकीत झव्हर १७ मि., क्षीतिज लोहिया २२, २५ मि.) वि. वि. ट्रुव्हिव्ह विकिंग्ज – ०.

किअॅक किकर्स – २ (श्रेष्ठ माहेश्वरी १६, २० मि.) – वि. वि. तपाडिया थंडर्स – ०
सीएनजी राठी रॉयल्स- २ (शशांक अटल २० मि., संकेत कारवा २२ मि.) वि. वि. मालपाणी पँथर्स- १ (अर्पित मंत्री ९ मि.)
………
१२ ते १६ वर्षांखालील मुले – एनपीएव्ही निन्जास – २ (दर्श जाजू ७ मि., कियान भन्साली ११ मि.) वि. वि. लारा लान्सर्स – १ (कुंज नवंदर २ मि.).
एबीएल विकिंग्ज – १ (कैरव हेदा १६ मि.) वि. वि. महारथी सटोना -०.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments