Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedपियाजिओ इंडियाने सबसिडीनंतरच्‍या गेम-चेंजिंग 'बॅटरी स‍बस्क्रिप्‍शन मॉडेल'सह इलेक्ट्रिक तीनचाकी बाजारपेठेत धुमाकूळ निर्माण...

पियाजिओ इंडियाने सबसिडीनंतरच्‍या गेम-चेंजिंग ‘बॅटरी स‍बस्क्रिप्‍शन मॉडेल’सह इलेक्ट्रिक तीनचाकी बाजारपेठेत धुमाकूळ निर्माण केला

पुणे, भारत – एप्रिल २६, २०२४ – पियाजिओ वेईकल्‍स प्रा. लि. (पीव्‍हीपीएल) या पियाजिओ ग्रुपच्‍या उपकंपनीने, तसेच भारतातील लहान व्‍यावसायिक वाहने व इलेक्ट्रिक तीनचाकींच्‍या (३ईव्‍ही) अग्रगण्‍य उत्‍पादक कंपनीने आपली इलेक्ट्रिक तीनचाकी ‘आपे इलेक्ट्रिक’साठी उल्‍लेखनीय ‘बॅटरी सबस्क्रिप्‍शन मॉडेल’ची घोषणा केली आहे.

 

ईव्‍ही मालकीहक्‍कासाठी नवीन युगाचा शुभारंभ

 

या नाविन्‍यपूर्ण उपक्रमाचा वेईकलमधील बॅटरीसाठी होणारा खर्च कमी करत इलेक्ट्रिक तीनचाकीचे मालकीहक्‍कामध्‍ये मोठा बदल घडवून आणण्‍याचा मनसुबा आहे. ग्राहक आता २.५९ लाख रूपयांमध्‍ये (एक्‍स-शोरूम महाराष्‍ट्र) आपे इलेक्ट्रिक खरेदी करू शकतात आणि डिलरशिपकडून भाडेतत्त्वावर मासिक शुल्‍कामध्‍ये उच्‍च दर्जाच्‍या पियाजिओ-मान्‍यताकृत बॅटरी पॅकचे सदस्‍यत्‍व घेऊ शकतात.

 

हे सबस्क्रिप्‍शन मॉडेल किफातयशीरपणाची खात्री देते. हे मॉडेल इलेक्ट्रिक वेईकलमधील बॅटरीसंदर्भातील प्रमुख समस्‍येचे निराकरण करते. ग्राहक बॅटरी मेन्‍टेनन्‍स, टिकाऊपणा किंवा रिप्‍लेसमेंट खर्चांबाबत चिंता न करता इलेक्ट्रिक मोबिलिटीचा आनंद घेऊ शकतात. पियाजिओ बॅटरी हेल्‍थसाठी पूर्णपणे जबाबदारी घेत आहे, ज्‍यामधून दीर्घकाळापर्यंत ईव्‍ही उत्तमरित्‍या कार्यरत राहण्‍याची खात्री मिळते.

 

पियाजिओ इंडियाचा विश्‍वास आहे की, हे मॉडेल धोरणकर्त्‍यांसाठी गेम चेंजर ठरू शकते, जे स‍बसिडीनंतर देखील ईव्‍हींचा विकास करत राहतील. किफायतशीरपणा व बॅटरीसंदर्भातील समस्‍यांचे निराकरण करत सबस्क्रिप्‍शन मॉडेल इलेक्ट्रिक तीनचाकींच्‍या अवलंबतेला गती देऊ शकते, ज्‍यामुळे शहरी भागांमध्‍ये हरित परिवहनाच्‍या खात्रीसह उत्‍सर्जन कमी होईल.

 

सबस्क्रिप्‍शन मॉडेल्‍सची माहिती

 

∙€ग्राहक प्रत्‍यक्ष डिलरशिप्‍समधून २.५९ लाख रूपयांना (एक्‍स-शोरूम महाराष्‍ट्र) आपे इलेक्ट्रिक खरेदी करू शकतात.

 

∙€ग्राहकांना डिलरशिपच्‍या माध्‍यमातून मासिक भाडे आकारत बॅटरी भाड्याने दिली जाते.

 

∙€वेईकल चेसिस आणि पॉवरट्रेन ग्राहकांच्‍या नावाने नोंदणीकृत केले जातात, ज्‍यामुळे एनबीएफसीच्‍या माध्‍यमातून चेसिस व पॉवरट्रेनवर हायपोथेकेशनसह कर्ज मिळू शकते.

 

सबस्क्रिप्‍शनची मुदत व फायदे

 

∙€बॅटरी भाड्याने देण्‍याची मुदत कार्गो वेईकल्‍ससाठी १२०,००० किलोमीटर किंवा ८ वर्ष आणि पॅसेंजर वेईकल्‍ससाठी १५०,००० किलोमीटर किंवा ८ वर्ष आहे.

 

∙€निर्धारित केलेल्‍या मायलेजपर्यंत पोहोचल्‍यानंतर मासिक भाडे शून्‍य रूपयांपर्यंत कमी होते.

 

∙€सबस्क्रिप्‍शनमध्‍ये सुरूवातीच्‍या भाडे मुदतीनंतर त्‍याच भाडेदरामध्‍ये बॅटरी बदलली जाते.

 

सुरूवातीची उपलब्‍धता आणि विस्‍तारीकरण योजना

 

बॅटरी सबस्क्रिप्‍शन मॉडेल भारतातील सर्व प्रमुख शहरांमध्‍ये (३० शहरे) लाँच करण्‍यात येईल.

 

गुरगाव

 

आग्रा

 

वारंगल

 

रायपूर

 

मथुरा

 

निजामबाद

 

नागपूर

 

लखनौ

 

कर्नूल

 

बेंगळुरू

 

कानपूर

 

अनंतपूर

 

तुमकुरु

 

अलाहाबाद

 

विजयवाडा

 

म्हैसूर

 

दिल्ली

 

गुंटूर

 

कोलार

 

नोएडा

 

विझाग

 

मुंबई

 

गाझियाबाद

 

चेन्‍नई

 

अहमदाबाद

 

ग्रेटर नोएडा

 

हैदराबाद

 

पुणे

 

फरीदाबाद

 

 

 

सबस्क्रिप्‍शन मॉडेलसाठी ग्राहकांना कोणतीही अतिरिक्‍त कागदपत्रे देण्‍याची गरज नाही, तसेच ते नियमित खरेदीप्रमाणे कोणत्‍याही वेळी प्रोग्रामला अनसबस्‍क्राइब करू शकतात किंवा त्‍यांची वेईकल विकू शकतात.

 

या घोषणेबाबत मत व्‍यक्‍त करत पियाजिओ वेईकल्‍स प्रा. लि.चे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. डिएगो ग्रॅफी म्‍हणाले, ”पियाजिओ इंडिया आपला दीर्घकालीन वारसा कायम राखत नाविन्‍यपूर्ण उत्‍पादने व सोल्‍यूशन्‍सच्‍या माध्‍यमातून ग्राहक समाधानाला प्राधान्‍य देत आहे. इंडस्‍ट्री-फर्स्‍ट ‘बॅटरी सबस्क्रिप्‍शन मॉडेल’ बॅटरीसंदर्भातील समस्‍यांचे निराकरण करते आणि किफायतशीर मालकीहक्‍क पर्याय देते, ज्‍यामुळे ईव्‍हीच्‍या अवलंबतेमधील अडथळे दूर होत आहेत. आम्‍हाला विश्‍वास आहे की, हे मॉडेल सबसिडीनंतर देखील ईव्‍हीचा विकास करत राहिल.”

 

आपले मत व्‍यक्‍त करत पियाजिओ वेईकल्‍स प्रा. लि. येथील सीव्‍ही डॉमेस्टिक बिझनेसचे कार्यकारी उपाध्‍यक्ष श्री. अमित सागर म्‍हणाले, ”ग्राहक आता फक्‍त ३०,००० रूपयांचे डाऊन पेमेंट आणि प्रतिमहिना ८,००० रूपयांच्‍या ईएमआयसह इलेक्ट्रिक तीन-चाकीचे मालक होऊ शकतात. या सुविधेमुळे तीनचाकी सीएनजीच्‍या तुलनेत वेईकल खरेदी करणे अधिक सोपे झाले आहे. बॅटरी सबस्क्रिप्‍शन मॉडेल उद्योगामध्‍ये ईव्‍ही अवलंबतेची नवीन लाट घेऊन येईल. चॅनेल भागीदार व ग्राहकांसोबतच्‍या आमच्‍या सुरूवातीच्‍या परस्‍परसंवादामधून आमचा विश्‍वास दृढ झाला आहे की, आम्‍ही विजेते आहोत. तसेच आमचा विश्‍वास आहे की, हे मॉडेल सबसिडीनंतरच्‍या युगामध्‍ये ईव्‍हीचा अवलंब सुरू ठेवेल, तसेच ग्राहकांना व उत्‍पादकांना व्‍यापक ईव्‍ही संधीमधून सर्वोत्तम गोष्‍टी मिळतील.”

 

अधिक माहितीसाठी, कृपया वर नमूद करण्‍यात आलेल्‍या शहरांमधील आपे इलेक्ट्रिक शोरूमला भेट द्या.

 

***

 

पियाजिओ वेईकल्‍स प्रा. लि. बाबत

 

पियाजिओ वेईकल्‍स प्रा. लि. ही पियाजिओ ग्रुपची १०० टक्‍के मालकीची उपकंपनी आहे. कंपनीने तीन-चाकी ब्रॅण्‍ड आपेच्‍या लाँचसह १९९९ मध्‍ये भारतात कार्यसंचालनांना सुरूवात केली. हा ब्रॅण्‍ड त्‍वरित यशस्‍वी ठरला आणि वर्षानुवर्षे अधिक दृढ होत आहे. पीव्‍हीपीएलने बाजारपेठेची निर्मिती केली, तिचा विकास केला आणि डिझेल व अल्‍टरनेट फ्यूएल तीन-चाकी श्रेणंमध्‍ये अग्रणी स्‍थान कायम राखले आहे. पियाजिओ डिझेल, पेट्रोल, सीएनजी व एलपीजी इंधन व्‍हेरिएण्‍टृसमधील तीन-चाकीच्‍या परिपूर्ण श्रेणीसह हलक्‍या वजनाच्‍या परिवहन उद्योगामधील आघाडीची कंपनी आहे आणि इलेक्ट्रिक वेईकल बाजारपेठेत देखील प्रवेश केला आहे. कंपनीच्‍या उत्‍पादनांना भारतातील ३.० दशलक्षहून अधिक समाधानी ग्राहकांनी पसंती दिली आहे, तसेच जगभरातील ५० हून अधिक देशांमध्‍ये निर्यात देखील करण्‍यात आली आहे. पियाजिओचे महाराष्‍ट्रातील बारामती येथे अत्‍याधुनिक उत्‍पादन प्‍लांट आहे, ज्‍याची ३,८०,००० हून अधिक व्‍यावसायिक वाहनांची व १,५०,००० दुचाकींची स्‍थापित वार्षिक उत्‍पादन क्षमता आहे. ही २,००,००० इंजिन्‍सच्‍या क्षमतेसह प्रगत इंजिन प्‍लांट असलेली इंजिन विभागांमधील स्‍वावलंबी कंपनी देखील आहे. पियाजिओचे ४००० हून अधिक प्रबळ कर्मचारी आहेत, ज्‍यामध्‍ये अनुभवी अभियंते, आरअॅण्‍डडी स्‍पेशालिस्‍ट्स, प्‍लांट कर्मचारी, विक्री, सेवा व विपणन व्‍यावसायिक यांचा समावेश आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या: http://piaggio-cv.co.in/

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments