Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedप्रभाग क्र.20 माता रमाई आंबेडकर रस्ता (ताडीवाला रस्ता) परिसरातील नागरिकांच्या उस्फुर्त प्रतिसादत...

प्रभाग क्र.20 माता रमाई आंबेडकर रस्ता (ताडीवाला रस्ता) परिसरातील नागरिकांच्या उस्फुर्त प्रतिसादत महाविकास आघाडीची भव्य पदयात्रा संपन्न

….

पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व इंडिया फ्रंट चे अधिकृत उमेदवार श्री. रवींद्रभाऊ धंगेकर यांच्या प्रचारार्थ माता रमाई आंबेडकर रोड (ताडीवाला रोड) परिसरात आयोजित पदयात्रेस मोठा प्रतिसाद मिळाला, उमेदवार श्री. रवींद्रजी धंगेकर यांना मिळणारा नागरिकांची पसंती व महाविकास आघाडी व सर्व घटक पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनचा उत्साह या मुळे ही मोठया

उत्साहात पदयात्रा संपन्न झाली

ही पदयात्रा संपूर्ण प्रायव्हेट रोड,पत्राचाळ,*भाजी मार्केट यांसह संपूर्ण माता रमाई आंबेडकर रोड (ताडीवाला रोड )भागात पदयात्रा मार्गस्थ झाली विविध ठिकाणी महिलांच्या वतीने श्री. रवींद्रजी धंगेकर यांचे औक्षण करून तसेच फटाकड्यांची आतिषबाजी करून उमेदवारांचे भव्य असे स्वागत करण्यात आले नंतर पंचशील चौकात पदयात्रेचा समारोप झाला,या प्रसंगी विविध ठिकाणी समारोप समयी उमेदवार श्री. रवींद्रभाऊ धंगेकर, व माजी गृहराज्य मंत्री रमेशदादा बागवे यांनी उपस्थितांना संबोधित केले.

रवींद्र धंगेकर म्हणाले की, पुण्याचा विकास गेल्या वर्षात का खुंटला याचा मी विचार करीत असतो. काँग्रेस पक्षामध्ये विकासाला गती आणि दिशा देण्याची क्षमता आहे पुण्यातील सर्व प्रमुख नागरी समस्याबाबत action plan कसा आखता येईल यावर मी अभ्यास करीत असून पुण्याच्या कासाला पुन्हा सुवर्णकाळ मी प्राप्त करून देईन.

माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे म्हणाले की, भाजप सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना बदलण्याचा प्रयत्न करणार असल्यामुळेच त्यांना या निवडणुकीत पराभूत करणे आवश्यक आहे. दलित मागासवर्गीय अन्य मागासवर्गीय भटके विमुक्त अल्पसंख्यांक महिला युवक सारे जण महाविकास आघाडीला साथ देतील हा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या पदयात्रेत पुणे शहर जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष श्री.अरविंदजी शिंदे,माजी नगरसेविका श्रीमती.लताताई राजगुरु, माजी महापौर सौ.रजनीताई त्रिभुवन,माजी नगरसेवक श्री. अविनाश बागवे,माजी शिक्षण मंडळ अध्यक्षा सौ.संगीताताई तिवारी,प्रदेश प्रतिनिधी श्री.मेहबूब नदाफ, पुणे शहर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष तथा भवानी ब्लॉक काँग्रेस चे अध्यक्ष श्री. सुजित यादव,पुणे मनपा शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष श्री. नुरुद्दीन सोमजी,सौ. जैनबजी आयु.विठ्ठल राव गायकवाड,बागवे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. मयूर गायकवाड, राष्ट्रवादी युवती पुणे कॅन्टोन्मेंट अध्यक्षा डॉ. निकिताताई गायकवाड,राष्ट्रवादी काँग्रेस चे पुणे शहर उपाध्यक्ष श्री. आनंदजी सवाने,श्री. कनवजी चव्हाण, श्री. नरेशजी सारवान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख श्री.संतोषभाऊ सोनवणे,nsui च्या प्रेरणा गायकवाड,पुणे शहर काँग्रेस चे उपाध्यक्ष श्री. उस्मानशेठ तांबोळी,पुणे शहर काँग्रेस चे चिटणीस श्री. राहुलदादा तायडे,श्री. अमोल राजगुरू,श्री. कुणाल राजगुरू,माजी स्वीकृत सदस्य श्री. किशोर वाघेला, श्री. वळाप्पा भिंगारे, श्री. उत्तम कांबळे,पुणे शहर काँग्रेस च्या सरचिटणीस सौ. मीराताई शिंदे, सौ. सुविधाताई त्रिभुवन,शहर काँग्रेस चे चिटणीस श्री. जमसूभाई शेख,शहर काँग्रेस च्या महिला सरचिटणीस सौ. उषाताई राजगुरू,पुणे शहर युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष श्री. संतोष हंगरगी,युवक काँग्रेस चे शहर सरचिटणीस श्री. सचिनजी सुडगे,काँग्रेस चे वॉर्ड अध्यक्ष श्री. शाम गायकवाड, श्री.ऍंथोनी वाकडे, शिवसेनेचे श्री. राहुलजी गव्हाणे,विनायक नाईक,श्री.गणेशजी घोलप राजेश दांडगे राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या सौ. सुप्रिया गायकवाड,राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे श्री. संतोष गायकवाड,युवक काँग्रेस चे संदीप कांबळे, ईश्वर गायकवाड, अभिषेक यादव, राम गायकवाड यांच्या सह काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आम आम आदमी

पक्ष, यांच्या सह महाविकास आघाडी व इंडिया फ्रंट चे सर्वच घटक पक्षांचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments